Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Arshad Warsi on Nepotism Kangana Ranaut: बॉलिवूड नेपोटिझमवर अर्शद वारसी थेट बोलला; म्हणाला, 'याची सुरुवात कंगना रनौतमुळे....'

Arshad Warsi on Nepotism Kangana Ranaut: बॉलिवूड नेपोटिझमवर अर्शद वारसी थेट बोलला; म्हणाला, 'याची सुरुवात कंगना रनौतमुळे....'

ABP माझा 1 month ago

Arshad Warsi on Nepotism: बॉलिवूडमधील (Bollywood) नेपोटिझमवर (Nepotism) अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहे. 2020 साली झालेल्या दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर नेपोटिझम हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला होता.

बऱ्याच स्टारकिड्सना (Starkids) नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केलं होतं. अनेकांनी स्टारकिड्सच्या सिनेमांचा निषेध केला होता. दरम्यान, नुकतंच, अर्शद वारसी याने नेपोटिझम या मुद्द्यावर आपले मत मांडले आहे. यात त्याने भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिचा देखील उल्लेख केला आहे. नेपोटिझमवर अर्शद वारसी नेमकं काय म्हणाला? पाहूयात.

नेपोटिझमवर अर्शद वारसीचं म्हणणं काय? (Arshad Warsi Breaks Silence On Bollywood Nepotism)

अलिकडेच अर्शद वारसीने फिल्मीज्ञानला मुलाखत दिली होती. नेपोटिझमवर बोलताना अर्शद वारसीने आपलं मत मांडलं. अभिनेता म्हणाला की, जेव्हा त्याने बॉलिवूड इंडस्ट्रीत प्रवेश केला होता, तेव्हा हा विषय जास्त चर्चेचा नव्हता, असं अर्शद वारसी म्हणाला. 'खरंतर मला नेपोटिझमशी काहीही प्रॉब्लेम नाही. माझं त्या कलाकारांवर नक्कीच खूप प्रेम आहे. जेव्हा मी सिनेइंडस्ट्रीत प्रवेश केला होता, तेव्हा हा विषय नव्हता. याची सुरुवात कंगना रनौतपासून सुरू झाली. तिने ही आयडिया सर्वात आधी मांडली, आणि मग हा मुद्दा जास्त वाढत गेला. प्रेत्येकजण यावर बोलू लागला', असं अर्शद वारसी म्हणाला.

'हो, नेपोटिझम या सिनेइंडस्ट्रीत आहे. परंतु, याने कोणताही फरक पडतो का? नाही. कारण माझं मन मला सांगतं की, शेवटी तुम्ही किती टॅलेंटेड आहात, हेच महत्त्वाचं ठरतं, याच गोष्टी तुम्हाला पुढे घेऊन जातात, असं अर्शद वारसी म्हणाला'. 'त्याचवेळी मला ही गोष्ट देखील समजते की, कोणत्याही स्टार किड्ससाठी या बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीत टिकून राहणं सोपं नाही. त्यांच्याकडून खूप अपेक्षा ठेवले जातात. मी हे आज मुलासोबतही होतानाही पाहत आहे', असंही अर्शद वारसी यावेळी म्हणाला.

'खंरतर स्टारकिड्सकडून खूप अपेक्षा ठेवल्या जातात. जे त्यांच्यासाठी अन्याय आहे. या सिनेइंडस्ट्रीत आऊटसाइडर्सपेक्षा स्टारकिड्सचे संबंध अधिक चांगले असतात. या कारणास्तव त्यांचा सिनेसृष्टीतील मार्ग अधिक सोपा होतो. दरम्यान, पुढे जाण्याचा प्रवास हा त्यांच्यासाठी तितकाच खडतर असतो, जितका आऊटसाइडर्ससाठी खडतर असतो', असंही अर्शद वारसी म्हणाला.

इतर बातम्या:

Nikki Tamboli And Arbaz Patel Unfollow: 'आपल्या पार्टनरला धोका...' निक्की तांबोळीनं बॉयफ्रेंडला चीट केलं? अरबाज पटेलची क्रिप्टिक पोस्ट, एकमेकांना केलं अनफॉलो, ब्रेकअप झालं?

Author : भाग्यश्री कांबळे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha