Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Arun Lakhani Vidhan Parishad Election 2026: गडकरी-फडणवीसांचे विश्वासू, धनाढ्य उद्योगपती अन् सुप्रिया सुळेंचे व्याही; कोण आहेत भाजपचे विधानपरिषद उमेदवार अरुण लखाणी?

Arun Lakhani Vidhan Parishad Election 2026: गडकरी-फडणवीसांचे विश्वासू, धनाढ्य उद्योगपती अन् सुप्रिया सुळेंचे व्याही; कोण आहेत भाजपचे विधानपरिषद उमेदवार अरुण लखाणी?

ABP माझा 1 week ago

Who is Arun Lakhani: आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने रविवारी आपल्या 11 उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली. या यादीत अपेक्षेप्रमाणे चंद्रपूर-गडचिरोली- वर्धा या विधानपरिषदेच्या जागेवरुन उद्योगपती अरुण लखाणी (Arun Lakhani) यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.

अरुण लखाणी हे सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचे व्याही आहेत. सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे (Revti Sule) आणि अरुण लखाणी यांचे पुत्र सारंग लखानी (Sarang Lakhani) यांचे लग्न ठरले आहे. काही दिवसांपूर्वीच दोन्ही कुटुंबीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना रेवती-सारंग यांच्या लग्नाचे निमंत्रण दिले होते. यानंतर काही दिवसांतच भाजपने अरुण लखाणी यांना विधानपरिषदेची (Vidhan Parishad Election 2026) उमेदवारी देऊ केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Maharashtra Politics News)

Vidhan Parishad Election 2026: कोण आहेत अरुण लखाणी?

लखाणी कुटुंब मूळचे विदर्भातील मलकापूर येथील आहेत. अनेक वर्षांपूर्वी त्यांचे कुटुंब व्यवसाय निमित्ताने नागपुरात स्थायिक झाले होते.

* लखाणी यांनी "विश्वराज इन्फ्रा" या कंपनीच्या माध्यमातून रस्ते निर्मितीचेही काम केले आहे.

* नागपूर अमरावती रोडवरील तिवसा शहराच्या जवळ फोर लेन रस्त्याची बांधणी त्यांनी केली. त्याकाळी तो विदर्भातील पहिला फोर लेन रस्ता मानला गेला होता...

* त्याशिवाय चंद्रपूर-राजुरा रोडची निर्मिती ही त्यांच्याच विश्वराज इन्फ्रा कंपनीने केली आहे.

* लखाणी नितीन गडकरी यांचे अत्यंत विश्वासू असून देवेंद्र फडणवीस यांचीही निकटवर्तीय मानले जातात.

* नागपूर महानगरपालिका हद्दीत पाणीपुरवठा कामाचे खाजगीकरण करताना फ्रान्सच्या ज्या "वेओलिया" कंपनीला काम मिळाले होते. त्यावेळी वेओलिया कंपनीसोबत भारतीय कंपनी म्हणून अरुण लखाणी यांच्या विश्वराज इन्फ्रा चे सामंजस्य करार होऊन "ऑरेंज सिटी वॉटर वर्क्स" (ocw) ही संयुक्त कंपनी स्थापन झाली होती.

* गेले अनेक वर्ष हीच ocw कंपनी नागपूर महापालिका हद्दीत पाणी पुरवठ्याचे काम करते.

* मात्र कोविडच्या काळात अरुण लखाणी ओसीडब्ल्यू मधून बाहेर पडले असून आता ओसीडब्ल्यूची मालकी पूर्णपणे वेओलिया कंपनीकडे आहे.

* अरुण लखाणी महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष राहिले असून इंडियन बॅडमिंटन असोसिएशनमध्येही पदाधिकारी राहिले आहेत.

* तरुण भारत या वर्तमानपत्राचा व्यवस्थापन पाहणाऱ्या नरकेसरी प्रकाशनमध्येही ते प्रमुख पदावर होते.

* भाजप नेत्यांच्या अत्यंत निकटवर्तीय असल्याने एकेकाळी अरुण लखाणी यांचं नाव आधी विधान परिषद सदस्य म्हणून नंतर राज्यसभेसाठी उमेदवार म्हणून चर्चेत होते. मात्र, अद्याप अरुण लखाणी यांची वर्णी विधान परिषद किंवा राज्यसभेवर लागू शकली नव्हती.

* अरुण लखाणी हे सुप्रिया सुळे यांचे व्याही आहेत, अरुण लखाणी यांचा मुलगा सारंग लखानी यांच्यासोबत सुप्रिया सुळे यांच्या मुलीचा साखरपुडा झालाय आणि लवकरच लग्न होणार आहे.

Vidhan Parishad Election 2026: निवडणूक कार्यक्रम जाहीर

अधिसूचना जारी : 25 मे

अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 1 जून

अर्जाची छाननी : 2 जून

अर्ज माघारीची शेवटची तारीख : 4 जून

मतदान : 18 जून - स. 8 ते दु. 4.

मतमोजणी : 22 जून

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha