Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Asha Bhosles Last Song: आशा ताईंच्या निधनानंतर रिलीज होणार त्यांचं शेवटचं गाणं, 2023 साली झालं रेकॉर्ड, अभिनेता भावुक

Asha Bhosles Last Song: आशा ताईंच्या निधनानंतर रिलीज होणार त्यांचं शेवटचं गाणं, 2023 साली झालं रेकॉर्ड, अभिनेता भावुक

ABP माझा 1 week ago

Asha Bhosles Last Recorded Song to Release: दिवंगत दिग्गज गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांच्या निधनानंतर संपूर्ण सिनेसृष्टीला (Entertainment) मोठा धक्का बसला. या धक्क्यानंतर अजूनही बॉलिवूड सावरलेलं नाही.

दरम्यान, आशा भोसले यांची शेवटची आठवण लवकरच रिलीज होणार आहे. आशा भोसले यांचं शेवटचं गाणं त्यांच्या जयंतीनिमित्त प्रदर्शित होणार आहे. आपल्या कारकि‍र्दीत आशा भोसले यांनी अनेक अविस्मरणीय गाणी दिली. 12 एप्रिल 2026 रोजी त्यांचं निधन झालं. आज आशा भोसले आपल्यात नाहीत. पण त्यांचा आवाज आजही लोकांच्या मनामध्ये घुमत आहे. पार्श्वगायिका म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीतील शेवटचं गाणं 'ओम का हरि' (Om Ka Hari) या सिनेमासाठी गाणं रेकॉर्ड केलं होतं. 'ओम का हरि' या चित्रपटातील गाण्याचे बोल 'ऐ मेरी जिंदगी, तू छुपी हैं कहां', असे आहे. माहितीनुसार, हे गाणं 8 सप्टेंबर रोजी रिलीज केले जाणार आहे.

'ओम का हरि' या सिनेमात मुख्य भूमिकेत अंशुमन झा झळकत आहेत. त्यांनी आपल्या सिनेमात आशा भोसले यांसारख्या महान गायिकेचे आवाज असणे, हे त्याच्यासाठी खूप खास आहे, असं सांगितलं. 'ओम का हरि' या सिनेमाविषयी बोलताना अभिनेता म्हणाला की, ''ओम का हरि' हा सिनेमा माझ्यासाठी खूप खास आहे. कारण याची स्टोरी माझ्या वडिलांना 'माझं तुमच्यावर प्रेम आहे' म्हणण्याचे महत्त्व सांगते, जे मला कधीच म्हणता आले नाही. सिनेमातील भावनिक वळणावर आशाजी यांच्या आवाजातील गाणे आहे. एक कलाकार म्हणून एक सुंदर आणि अविस्मरणीय क्षणांपैकी एक आहे', असं अभिनेता म्हणाला.

कधी रेकॉर्ड झाले हे गाणे? (Asha Bhosles Last Recorded Song to Release on Her Birth Anniversary)

'ऐ मेरी जिंदगी, तू छुपी हैं कहां' हे गाणं 2023 साली रेकॉर्ड करण्यात आले होते. तेव्हा आशा भोसले यांचं वय 90 वर्षांपेक्षा जास्त होतं. तरी देखील त्यांनी आपल्या सुरेल आवाजातून या गाण्यात जीव ओतला. 'ओम का हरि' या चित्रपटाचं दिग्दर्शन हरीश व्यास यांनी केले आहे. वडील आणि मुलाच्या नात्यावर आधारीत या ड्रामा कॉमेडी प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

आशा भोसले यांचे शेवटचे गाणे प्रदर्शित करताना, सिनेमाचे दिग्दर्शक हरीश व्यास म्हणाले की, 'आशाजींच्या वाढदिवसानिमित्त हे गाणं प्रदर्शित करणं ही त्यांच्या सुमधुर आवाजाला, आणि कोट्यवधि फॅन्सप्रति एक सन्मान आहे', असं 'ओम का हरि' या सिनेमाचे दिग्दर्शक म्हणाले.

इतर बातम्या:

बॉलिवूडवर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध दिग्दर्शकाचे निधन, सलमान खान झाला भावूक, पोस्ट शेअर करुन फिल्ममेकरच्या पत्नीलाही दिला धीर

Author : भाग्यश्री कांबळे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha