Dailyhunt
Ashok Kharat Case Nashik Crime News: गर्भपाताचा विषय निघताच अशोक खरातचा वकील धडाधड बोलला; सुनावणीत नेमकं काय घडलं?

Ashok Kharat Case Nashik Crime News: गर्भपाताचा विषय निघताच अशोक खरातचा वकील धडाधड बोलला; सुनावणीत नेमकं काय घडलं?

ABP माझा 1 week ago

Ashok Kharat Case Nashik Crime News: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली.

या सुनावणीसाठी अशोक खरातला व्हीडीओ कॉनफरन्सद्वारे उपस्थित करण्यात आलं होतं.

सदर प्रकरणातील तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी आणि सरकारी वकील ॲड. शैलेंद्र बागडे आणि आरोपी अशोक खरातचे वकील सचिन भाटे यांनी जोरदार युक्तिवाद केला. यावेळी अशोक खरात मास्टरमाईंड आहे. तो तपासात सहकार्य करत नाहीय, अशी माहिती सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयाला सांगितली. तसेच 7 दिवसांची पोलीस कोठडीची मागणीही सरकारी वकिलांकडून करण्यात आली. यावर न्यायालयाने अशोक खरातला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. (Ashok Kharat Nashik District Sessions Court)

गर्भपाताचा विषय निघताच अशोक खरातचा वकील धडाधड बोलला- (Ashok Kharat Nashik District Sessions Court)

आरोपीने अत्याचार केला त्यामुळे महिला गर्भवती राहिली. त्याने गोळ्या देऊन गर्भपात झाला. गोळ्या कुठून आणल्या. एक औषध दिले होते ते कुठून आणले त्यात काय होतं हे तपास बाकी आहे. आधारकार्ड, पॅनकार्ड आरोपी आणायला सांगत होते. ते कशासाठी हे तपास करायचे आहे. त्यासाठी 7 दिवस पोलीस कोठडी पाहिजे, अशी माहिती तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांनी न्यायालयाला दिली. गर्भपातचा विषय निघताच आरोपी अशोक खरातचे वकील सचिन भाटे यांनी युक्तिवाद केला. इतक्यात दिवस पीडित गप्प का बसली?, 2023 ला गर्भपात झाला तर 2025 पर्यत खरातच्या संपर्कात कशी राहिली?, असा सवाल सचिन भाटे यांनी उपस्थित केला. फसवणूक अपहारचा गुन्हा हा नाही, आधार कार्ड पॅनकार्ड का घेतले याला अर्थ नाही. व्हिडीओ सिलेक्ट आहेत, तेच व्हायरल होत आहेत. त्यावर कारवाई केली जात आहे. त्यामुळे नवीन तपास करणेसाठी कोठडीची गरज नाही, असा युक्तिवादही सचिन भाटे यांनी केला. (Ashok Kharat Case Nashik Crime News)

सरकारी वकील काय म्हणाले? (Ashok Kharat Case)

तू अप्सरा आहेस , असं आरोपी अशोक खरात पीडितेला सांगत होता. असे सांगून त्याने पीडितेवर अत्याचार केला. जडिबुटीचे औषध देत होता ते काय आहे, ते शोधायचे आहे. पीडितेच्या नातेवाईकांकडे तो आधारकार्ड पॅन कार्ड मागत होता. प्रॉपर्टीचा काही विषय होता का? ती ताब्यात घ्यायची होतो का?, हे तपासण्यासाठी 7 दिवसांची पोलीस कोठडी पाहिजे आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.

अशोक खरात व्हिसीद्वारे न्यायालयात हजर, कोर्टात काय काय झालं?, VIDEO:

Ashok Kharat Case Nashik Crime News: जरा मोठ्याने बोल...न्यायाधीशांचे 2 प्रश्न; अशोक खरातचे हात जोडून उत्तर, आजच्या सुनावणीत काय काय घडलं? A टू Z माहिती

Ashok Kharat Case Nashik Crime News: पिंक टी-शर्ट, वाढलेली दाढी अन् स्क्रीनवर 'भोंदू' खरात; VC सुनावणीत सरकारी वकिलांनी मांडला क्रूरतेचा पाढा, कोर्टात नेमकं काय-काय घडलं?

Author : मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha