Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Ashok Kharat Case Nashik Crime News: जरा मोठ्याने बोल...न्यायाधीशांचे 2 प्रश्न; अशोक खरातचे हात जोडून उत्तर, आजच्या सुनावणीत काय काय घडलं? A टू Z माहिती

Ashok Kharat Case Nashik Crime News: जरा मोठ्याने बोल...न्यायाधीशांचे 2 प्रश्न; अशोक खरातचे हात जोडून उत्तर, आजच्या सुनावणीत काय काय घडलं? A टू Z माहिती

ABP माझा 1 month ago

Ashok Kharat Case Nashik Crime News: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायालयाने अशोक खरातला 8 एप्रिलपर्यंत पोलील कोठडी सुनावली.

या सुनावणीसाठी अशोक खरात याला व्हीडीओ कॉनफरन्सद्वारे उपस्थित करण्यात आले. अशोक खरातच्या सुरक्षेच्या कारणामुळे एसआयटीकडून अशोक खरातला व्हीसीद्वारे हजर करण्याचा अर्ज केला होता. एसआयटीचा हा अर्ज न्यायालयाने मान्य केला आहे. आज अशोक खरातला व्हीसीद्वारे हजर करण्याची एसआयटीला परवानगी दिली. यावेळी कोर्टरुममध्ये 4 स्क्रीन लावण्यात आल्या. बीइन ईचपुरानी यांच्या कोर्टात आज अशोक खरातप्रकरणी ऑनलाईन सुनावणी झाली. अशोक खरात प्रकरणाचे तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी आणि सरकारी वकील ॲड. शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. (Ashok Kharat Case Nashik Crime News)

आजच्या ऑनलाईन सुनावणीत अशोक खरात उपस्थित राहिला, तेव्हा न्यायाधीशांनी त्याला नाव विचारले. यावेळी आवाज कमी आल्यामुळे न्यायाधीशांनी अशोक खरातला मोठ्याने बोलण्यास सांगितले. तर पुढे सुनावणीत तुमचे वकील म्हणून भाटे वकील इथे बाजू मांडत आहे तेच तुमचे वकील आहेत का?, असं न्यायाधीशांनी विचारले. यावर हो असं अशोक खरातने उत्तर दिलं. त्यानंतर सुनावणीच्या शेवटी सगळ्यांचा युक्तिवाद झाल्यानंतर तुला काही बोलायचे आहे का?, असा प्रश्न न्यायाधीशांनी विचारला. यावर हात जोडून काही नाही, असं अशोक खरात म्हणाला. (Ashok Kharat Case Hearing Nashik)

आजच्या सुनावणीत काय काय घडलं? (Ashok Kharat Case Nashik Crime News)

  • आरोपी अद्याप हजर नसल्याने वकिल पत्रावर सही नाही, असे आरोपीचे वकिलांचे म्हणणे...
  • तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांनी गुन्ह्याचे स्वरूप सांगितले.
  • आरोपी अशोक खरात vc द्वारे हजर
  • आरोपीला न्यायाधीशांनी नाव विचारले.
  • आवाज येत नसल्याने जोरात बोलण्यास सांगितले.
  • तुमचे वकील म्हणून भाटे वकील इथे बाजू मांडत आहे तेच तुमचे वकील आहेत का?, असं न्यायालयाने विचारले.
  • यावर अशोक खरात हो म्हणाला...

तपास अधिकारी काय म्हणाले? (Ashok Kharat Nashik District Sessions Court)

  • आरोपीने अत्याचार केला त्यामुळे महिला गर्भवती राहिली. त्याने गोळ्या देऊन गर्भपात झाला.
  • गोळ्या कुठून आणल्या. एक औषध दिले होते ते कुठून आणले त्यात काय होतं हे तपास बाकी आहे.
  • अधारकार्ड पॅन कार्ड आरोपी आणायला सांगत होते. ते कशासाठी हे तपास करायचे आहे. त्यासाठी 7 दिवस पोलीस कोठडी पाहिजे.

सरकारी वकील काय म्हणाले? (Ashok Kharat Nashik District Sessions Court)

  • तू अप्सरा आहेस , असं आरोपी पीडितेला सांगत होता.
  • असे सांगून अत्याचार केला.
  • जडिबुटीचे औषध देत होता ते काय आहे, ते शोधायचे आहे.
  • पीडितेच्या नातेवाईकांकडे तो आधारकार्ड पॅन कार्ड मागत होता.
  • प्रॉपर्टीचा काही विषय होता का? ती ताब्यात घ्यायची होतो का?, हे तपासण्यासाठी 7 दिवसांची पोलीस कोठडी पाहिजे.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha