Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अशोक खरातवर चित्रपट, दीपाली सय्यद रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत, धमक्यांबाबत गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले...

अशोक खरातवर चित्रपट, दीपाली सय्यद रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत, धमक्यांबाबत गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले...

ABP माझा 1 week ago

Deepali Sayyed Ashok Kharat Movie: नाशिकमधील (Nashik News) भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरण समोर आलं आणि अख्खा महाराष्ट्र (Maharashtra) हादरला. एवढंच काय तर, भोंदूगिरी करणारा कॅप्टन अशोक खरात (Caption Ashok Kharat) आणि त्याच्यासोबतचे राजकारण्याचे लागेबांधे समोर आले आणि राजकीय वर्तुळातही खळबळ माजली.

अनेक महिलांना अंधश्रद्धेच्या गर्तेत लोटून ओरबाडणाऱ्या अशोक खरातला बेड्या ठोकण्यात आल्यात. अशातच आता महाराष्ट्र ढवळून काढणाऱ्या या अशोक खरातवर सिनेमा येत असून शिवसेना नेत्या आणि 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री दीपाली सय्यद (Deepali Sayyed) या सिनेमात एका राजकारण्याची भूमिका साकारणार असल्याचा खुलासा त्यांनी स्वतः एका मुलाखतीत बोलताना केलाय. पण, दीपाली सय्यद यांनी सिनेमा आणि त्यातल्या भूमिकेविषय खुलासा केल्यापासून आपल्याला धमक्या येत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

भोंदूबाबा, नराधम अशोक खरात प्रकरणावरच्या सिनेमाचं शुटिंग लवकरच सुरू होणार असून सिनेमात अभिनेत्री दीपाली सय्यद यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे. मात्र, दीपाली सय्यद यांनी सिनेमात काम करू नये, रुपाली चाकणकर यांची भूमिका साकारू नये, असं म्हणत दीपाली सय्यद (Dipali sayyad) यांना धमक्या येत असल्याचा खळबळजनक दावाच त्यांनी केला आहे. अशोक खरात प्रकरणावर सिनेमा (Cinema) येत असताना आणि रोल करत असताना कोणीही कलाकारावर दबाव आणू नये. मला काही धमक्यांचे फोन येत आहेत, पण कर नाही त्याला डर कशाचा? हे माझं प्रोफेशन आहे आणि हे न करण्यासाठी जर मला फोन येत असतील तर हे चुकीचं आहे, असं शिवसेना नेत्या, अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी म्हटलंय. तर, आता दीपाली सय्यद यांना येणाऱ्या धमक्यांवर आता शिवसेना आमदार आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दीपाली सय्यद यांनी त्यांना येत असलेल्या धमक्यांसंदर्भात जे दावे केले, त्याबाबत शिवसेना आमदार आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी एबीपी माझाकडे भूमिका मांडली आहे. दीपाली सय्यद यांच्या आरोपांवर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सिनेमात कुणी काम करावं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय, असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटलंय. कुणीही यात राजकारण आणण्याचं कारण नाही, धमक्यांसंदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल, असं योगेश कदम म्हणाले आहेत.

'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'मधून अशोक खरातचे काळे कारनामे रुपेरी पडद्यावर

जगाच्या राजकारणात गाजत असलेलं अन् अनेक राष्ट्रप्रमुखांना धडकी भरवणारं एक नाव म्हणजे, जेफ्री एपस्टिन... त्याचे काळे कारनामे उघड करणाऱ्या 'एपस्टिन फाईल्स'ची चर्चा जगभरात होतेय. गेल्या महिन्यात महाराष्ट्रातही असंच एक प्रकरण गाजलं, ते म्हणजे अशोक खरात. या खरातचे भलते उद्योग आता लवकरच रुपेरी पडद्यावर बघायला मिळणार आहेत. दिग्दर्शक स्वरूप बी सावंत यांचा 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' नावाने अशोक खरातच्या काळ्या कृत्यावर आधारित सिनेमा लवकरच येत आहे. या सिनेमात दीपाली सय्यद झळकणार असून त्यांनी स्वतः याबद्दल खुलासा केला आहे. त्याच अनुषंगाने अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. दीपाली सय्यद यांनी बोलताना जेव्हापासून आपण या सिनेमाबाबत सांगितलंय, तेव्हापासून आपल्याला धमक्या येत असल्याचा दावा त्यांनी केलाय.

'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चं पोस्टर रिलीज

नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण समोर आलं आणि अख्खा महाराष्ट्र ढवळून निघाला. या प्रकरणानं सर्वांनाच हादरवून सोडलं, एवढंच काय तर, या प्रकरणानं राजकीय वर्तुळातही खळबळ माजली. कारण या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकरांचं नाव समोर आलं. अनेक महिलांना अंधश्रद्धेच्या गर्तेत लोटून ओरबाडणाऱ्या अशोक खरातला बेड्या ठोकण्यात आल्यात. तसेच, या प्रकरणातील अनेक आक्षेपार्ह्य व्हिडीओसुद्धा समोर आलेत. आता अख्खा महाराष्ट्र हादरवणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरातच्या काळ्या कृत्यांवर सिनेमा येणार आहे. येत्या 2 ऑक्टोबरला महाराष्ट्रात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. आणि या सिनेमाचं नाव आहे महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स... या सिनेमाचं मोशन पोस्टर नुकतंच सोशल मिडियावर रिलीज झालंय. या सिनेमात रुपाली चाकरणकरांच्या भूमिकेत शिवसेना नेत्या आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपाली सय्यद झळकणार आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन स्वरूप बी. सावंत करणार असून सिनेमाच्या रिलीज आधीच पोस्टरमुळे कमालीची चर्चा रंगलीये.

पाहा व्हिडीओ : कर नाही त्याला डर कशाचा? हे माझं प्रोफेशन आहे... : दीपाली सय्यद

Author : एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha