Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अवघ्या 21 वर्षीय मॉडेलला घरात घुसून संपवलं, घटना घडताच बहिणींचा संशय खरा ठरला अन् जिम ट्रेनर फरार

अवघ्या 21 वर्षीय मॉडेलला घरात घुसून संपवलं, घटना घडताच बहिणींचा संशय खरा ठरला अन् जिम ट्रेनर फरार

ABP माझा 1 week ago

Delhi Crime: राजधानी दिल्ली पुन्हा एकदा एका हत्येच्या घटनेने हादरली आहे. ही घटना ओल्ड महावीर नगर, टिळक नगर येथे घडली. 21 वर्षीय मुस्कान या तरुणीची तिच्या घरात घुसून चाकूने वार करून ( Delhi Crime) हत्या करण्यात आली.

इम्रान नावाचा आरोपी एक जिम ट्रेनर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तो घरात घुसला आणि त्याला मुस्कान एकटी आढळली, तेव्हा त्याने तिची हत्या केली. गुन्हा घडल्यापासून आरोपी फरार आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस हत्येशी संबंधित पुराव्यांचा शोध घेत आहेत. मृत तरुणीचा मित्र अमन याच्या म्हणण्यानुसार, मुस्कानच्या बहिणीने त्याला फोन करून ताबडतोब घरी जाऊन मुस्कानची चौकशी करण्यास सांगितले. तिने त्याला सांगितले की कोणीतरी तिच्यावर चाकूने हल्ला केला आहे. तो घरी पोहोचेपर्यंत रुग्णवाहिका आधीच आली होती. तत्काळ रुग्णालयात दाखल केले. तो सुद्धा गेला, पण पोलिसांनी त्याला वरच्या मजल्यावर जाऊ दिले नाही.

मुस्कानवर चाकूने हल्ला

अमनने सांगितले की, मुस्कानला तीन बहिणी आणि एक लहान भाऊ आहे. घटनेवेळी मुस्कान घरात एकटीच होती.तिच्या बहिणी चंदीगडला गेल्या होत्या. त्याच्या बहिणीनेच त्याला सांगितले की, इम्रान काही काळापासून मुस्कानचा छळ करत होता आणि तिचा पाठलाग करत होता. घटना घडताच, त्याच्यावर सर्वात आधी संशय आला.

मुस्कान अर्धवेळ मॉडेल म्हणून काम करत होती

अमनने सांगितले की, बुधवारी सायंकाळी इम्रान घरात घुसला आणि त्याने मुस्कानवर चाकूने वार करून तिची हत्या केली. मुस्कानचा भाऊ, आकाशने त्याला तिला घरात ओढत नेताना पाहिले होते. मात्र, या प्रकरणी पोलिसांकडून कोणतीही नवीन माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. एका मित्राने सांगितले की, मुस्कान विद्यार्थिनी होती आणि अर्धवेळ मॉडेल म्हणूनही काम करत होती.

इतर महत्वाच्या बातम्या

Author : जयदीप मेढे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha