Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! कन्या, तूळ राशीसह 'या' 5 राशींना जुलैच्या पहिल्या आठवड्यात लागणार लॉटरी, वाचा लकी राशी

Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! कन्या, तूळ राशीसह 'या' 5 राशींना जुलैच्या पहिल्या आठवड्यात लागणार लॉटरी, वाचा लकी राशी

ABP माझा 1 week ago

Baba Vanga Prediction : ज्योतिष शास्त्रानुसार, बाबा वेंगाने (Baba Venga) दिलेल्या भविष्याबाबत देशभरात उत्सुकता निर्माण होते. याचं कारण म्हणजे बाबा वेंगा यांना भविष्यात घडणाऱ्या घटनांचा आधीच अंदाज लावता येतो.

त्यानुसार, आता जुलै (July 2026) महिन्याला सुरुवात झाली आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, 6 ते 12 जुलै असा जुलै महिन्याचा पहिला आठवडा असणार आहे. या आठवड्यात अनेक शुभ योग (Yog) निर्माण होणार आहे. मात्र, बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, कोणत्या 5 राशींसाठी जुलैचा पहिला आठवडा भाग्यशाली ठरणार आहे ते जाणून घेऊयात.

वृषभ रास (Taurus Horoscope)

बाबा वेंगा यांच्या भाकितानुसार, वृषभ राशीच्या लोकांसाठी 6 ते 12 जुलैपर्यंतचा काळ फार भाग्यशाली ठरणार आहे. या काळात नोकरदार वर्गातील लोकांसाठी उत्पन्नाच्या नवीन संधी निर्माण होतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. तसेच, आत्मविश्वासाने तुम्ही काम कराल. तुमच्या व्यवसायाला चांगली गती मिळेल.

कन्या रास (Virgo Horoscope)

बाबा वेंगा यांच्या भाकितानुसार, नवीन आठवड्यात तुम्ही जी मेहनत घ्याल त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी चालून येईल. तसेच, जर तुम्हाला एखादं वाहन खरेदी करायचं असेल तर त्यासाठी हा काळ योग्य आहे. गुंतवणुकीतून तुम्ही भविष्यासाठी चांगले पैसे जमा कराल. आर्थिक बाबतीत तुम्ही सक्षम असाल.

तूळ रास (Libra Horoscope)

बाबा वेंगा यांच्या नवीन आठवड्याच्या भाकितानुसार, जुलैच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला अचानक धनलाभ होईल. बिझनेसमध्ये एखादी मोठी डील तुमच्या हाती लागू शकते. तसेच, तुमच्या हातून चांगलं कार्य घडेल. सकारात्मक दृष्टीकोन राहील. समाजात तुमची वेगळी ओळख निर्माण होईल.

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा आर्थिक वृद्धीचा असणार आहे. या काळात तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. तुमच्या प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. तसेच, तु्म्ही एखाद्या नवीन कार्याची सुरुवात देखील करु शकता. मानसिक शांती लाभेल.

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांना नवीन आठवड्यात नशिबाची चांगली साथ मिळेल. उत्पन्नाची अनेक नवीन साधनं तुमच्यासमोर उपलब्ध होतील. तसेच, तुम्हाला अचानक धनलाभ होईल. तुमच्या कामांना चांगली गती मिळेल. तसेच, तुम्ही एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करु शकता.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Vyatipat Yog 2026 : जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच जुळून येणार अशुभ 'व्यतिपात योग'; 'या' 5 राशींना आतापासूनच सावधानतेचा इशारा

Author : एबीपी माझा वेब टीम

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha