Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Badshah Marathi Debut Rap Song: एकीकडे घटस्फोट घेतल्याचं सांगितलं, तर दुसरीकडे रॅपर बादशाहनं थेट महाराष्ट्रासाठी प्रेमपत्र लिहिलंय; नेमकं काय घडलंय?

Badshah Marathi Debut Rap Song: एकीकडे घटस्फोट घेतल्याचं सांगितलं, तर दुसरीकडे रॅपर बादशाहनं थेट महाराष्ट्रासाठी प्रेमपत्र लिहिलंय; नेमकं काय घडलंय?

ABP माझा 1 month ago

Badshah Marathi Debut Rap Song: रॅपर बादशाह (Rapper Badshah) सध्या त्याच्या घटस्फोटाच्या (Rapper Badshah Divorce) बातम्यांमुळे चर्चेत आहे. बादशाहनं साधारणतः पाच महिन्यांपूर्वी गुपचूप आपली दुसरी लग्नगाठ बांधलेली, पण पाचच महिन्यांत प्रसिद्ध गायक आणि रॅपरच्या संसाराचा काडीमोड झाला.

स्वतः बादशाहनं पोस्ट करुन यासंदर्भात माहिती दिलीय. पण, एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा सुरू असतानाच रॅपर बादशाहनं त्याच्या चाहत्यांना धमाकेदार गूड न्यूज दिलीय. बादशाहनं धमाकेदार मराठी गाणं (Badshah Marathi Song) रिलीज केलंय.

बादशाहनं एक नवं गाणं रिलीज केलं आहे. पत्नी ईशा रिखीपासून वेगळं होत असल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यासोबतच, त्यानं हे नवं हिप-हॉप गाणंही रिलीज केलं आहे. ज्याचं वर्णन त्यानं 'महाराष्ट्रासाठी लिहिलेले प्रेमपत्र' असं केलं आहे.

बादशाहनं सोमवारी त्याचं पहिलं मराठी हिप-हॉप गाणं 'चिमणा' प्रदर्शित केलं. हे गाणं पारंपरिक मराठी लोकसंगीताला एका नाविन्यपूर्ण आणि आधुनिक शैलीत सादर करतं, जेणेकरून ते सर्व वयोगटातील श्रोत्यांना आकर्षित करेल.

बादशाहच्या नव्या गाण्यात हिंदी आणि मराठी ओळींचा सुरेख संगम (Badshah Marathi Song)

बादशाहचं नवं गाणं म्हणजे, 'गोंधळ' या आगामी मराठी सिनेमातील 'एक चिमणा चिवचिवला' या पारंपरिक लोकगीताचंच एक नवं रूप आहे. बादशाहनं या ग्रामीण मराठी लोकगीताला आधुनिक रॅप आणि दमदार बीट्सची जोड देऊन त्याला जागतिक दर्जाचा लूक दिला आहे. गाण्याची सुरुवात त्या प्रसिद्ध ग्रामीण ओळींनी होते, "एक चिमणा चिवचिवला, माझा साजन जागा झाला हो, सूर्य उगवला..." त्यानंतर, बादशाह हिंदी आणि मराठी शब्दांचं मिश्रण करत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण हिप-हॉप शैलीत गाणं पुढे नेतो, ज्यामुळे या गाण्याला एक अस्सल स्थानिक बाज प्राप्त होतो.

'एक चिमणा चिवचिवला' हे गाणं खऱ्या अर्थानं खास बनवण्यासाठी बादशाहनं अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलंय. आपलं पहिलंच मराठी गाणं अधिक खास बनवण्यासाठी बादशाहनं अनेक नामवंत कलाकारांसोबत काम केलं आहे. या गाण्यात मराठी अभिनेत्री नेहा खान देखील झळकली आहे. या गाण्याला बॉलिवूड गायक दिव्या कुमार आणि प्रसिद्ध मराठी लोकगायक नागेश मोरवेकर यांनी आपला आवाज दिला आहे. हितेननं निर्मिती केलेलं हे गाणं 'देशी' लोकसंगीत आणि बादशाहची वैशिष्ट्यपूर्ण 'हिट' शैली यांचा एक उत्कृष्ट संगम आहे.

"'चिमणा' हे महाराष्ट्राच्या भव्य संस्कृतीसाठी मी लिहिलेले प्रेमपत्र..."

आपल्या नव्या गाण्याबद्दल बोलताना बादशाहनं सांगितलं की, भारतातील प्रादेशिक संगीत हा एक अनमोल ठेवा आहे आणि त्याला देशाच्या कानाकोपऱ्यातील संगीताचा उत्सव साजरा करायचा आहे. तो म्हणाला, "भारतातील प्रादेशिक संगीत म्हणजे, एक अनमोल ठेवाच आहे आणि मला त्यातील प्रत्येक भागाचे संगीत साजरे करायचे आहे... 'चिमणा' हे महाराष्ट्राच्या भव्य संस्कृतीसाठी मी लिहिलेलं प्रेमपत्र आहे. हा प्रोजेक्ट ज्या प्रकारे साकारला आहे, त्याबद्दल मी खूप आनंदी आहे... आणि हे गाणं माझ्या त्या सर्व मराठी चाहत्यांसाठी आहे, जे अगदी सुरुवातीपासून माझ्यासोबत आहेत..."

बादशाहचं नवं मराठी गाणं ऐकलं?

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha