Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Bahujan Vikas Aaghadi Merge Shivsena: हितेंद्र ठाकूरांची बहुजन विकास आघाडी शिवसेनेत विलीन होण्याची शक्यता; बदल्यात काय मिळणार? एकनाथ शिंदेंची स्मार्ट खेळी

Bahujan Vikas Aaghadi Merge Shivsena: हितेंद्र ठाकूरांची बहुजन विकास आघाडी शिवसेनेत विलीन होण्याची शक्यता; बदल्यात काय मिळणार? एकनाथ शिंदेंची स्मार्ट खेळी

ABP माझा 5 months ago

Bahujan Vikas Aaghadi Merge Shivsena: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जून रोजी मतदान तर 22 जून रोजी मतमोजणी (Vidhan Parishad Election 2026) होणार आहे.

त्याआधी विधान परिषदेच्या जागावाटपावरुन सत्ताधारी महायुतीत जोरदार रस्सीखेच पाहायला मिळतेय. याचदरम्यान, एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

ठाणे विधान परिषदेतून बहुजन विकास आघाडीचे नेते क्षितीज ठाकूर यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. रवींद्र फाटक यांच्या जागी उमेदवार म्हणून बविआचे क्षितीज ठाकूर (Kshitij Thakur) यांची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकूर पिता-पुत्रांना प्रस्ताव दिल्याची सूत्रांची माहिती आहे. बहुजन विकास आघाडीला (Bahujan Vikas Aaghadi) शिवसेनेत विलीन करण्याचा एकनाथ शिंदेंनी प्रस्तावही देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. मतांची गोळाबेरीज वाढविण्यासाठी शिवसेनेची ही खेळी सुरु आहे. त्यामुळे हितेंद्र ठाकूरांची बविआ शिवसेनेत विलीन होणार की नाही?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. काही दिवसांआधी प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन झाला होता. याबदल्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांना शिवसेनेकडून विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली. (Bahujan Vikas Aaghadi Merge Shivsena)

विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुका- (Vidhan Parishad Election 2026)

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच राज्यात न झाल्याने या मतदारसंघामध्ये पूर्वी निवडून आलेल्या आमदारांचा कार्यकाळ संपुष्टात येऊनही निवडणूक होऊ शकली नाही. अशात, गेल्या दोन अडीच वर्षांपासून आमदारकीच्या जागा रिक्त आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण मतदार संख्येच्या 75 टक्के मतदार संख्या असेल तर विधान परिषदेची निवडणूक घेता येते. विधान परिषदेच्या एकूण 78 सदस्य संख्येपैकी 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडून जात असतात. सोलापूर, अहमदनगर, ठाणे, जळगाव, नांदेड, सांगली-सातारा, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, नाशिक, अमरावतीच्या स्थानिक संस्थेच्या विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे.

आधी कोणती जागा कोणाकडे होती? आणि कोणाकडे किती जागा? (Vidhan Parishad Election 2026)

आधीचे आमदार कोण?-

  • सोलापूर : प्रशांत परिचारक (भाजप)
  • अहिल्यानगर : अरुणकाका जगताप (राष्ट्रवादी)
  • ठाणे : रवींद्र फाटक (शिवसेना)
  • जळगाव : चंदूभाई पटेल (भाजप)
  • सांगली-सातारा : मोहनराव कदम (काँग्रेस)
  • नांदेड : अमर राजूरकर (काँग्रेस)
  • यवतमाळ : दुष्यंत चतुर्वेदी (शिवसेना)
  • पुणे : अनिल भोसले (राष्ट्रवादी)
  • भंडारा-गोंदिया : परिणय फुके (भाजप)
  • रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग : अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी)
  • नाशिक : नरेंद्र दराडे (शिवसेना)
  • वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली : रामदास आंबटकर (भाजप)
  • अमरावती : प्रवीण पोटे (भाजप)
  • धाराशिव-लातूर-बीड : सुरेश धस (भाजप)
  • परभणी-हिंगोली : विप्लव बाजोरिया (शिवसेना)
  • छत्रपती संभाजीनगर-जालना : अंबादास दानवे (शिवसेना)
  • नागपूर : चंद्रशेखर बावनकुळे (भाजप)

पुढील मतदारसंघासाठी विधान परिषदेची निवडणूक होणार- (Vidhan Parishad Election 2026)

  1. अहिल्यानगर
  2. सांगली-सातारा
  3. भंडारा-गोंदिया
  4. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग
  5. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली
  6. धाराशिव-लातूर-बीड
  7. परभणी-हिंगोली
  8. छत्रपती संभाजी नगर-जालना

विधानपरिषद निवडणूकीचा संपूर्ण कार्यक्रम- (Vidhan Parishad Election 2026)

  • निवडणुकीची अधिसूचना- 25 मे
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख- 1 जून
  • उमेदवारी अर्जांची छाननी- 2 जून
  • अर्ज माघारीची मुदत- 4 जून
  • मतदान- 18 जून (स.8 ते दु.4)
  • मतमोजणी- 22 जून

क्षितीज ठाकूरांना ठाणे विधानपरिषदेच्या उमेदवारीची शक्यता, VIDEO:

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha