Nagpur News : बालभारतीच्या (Balbarati) इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील (Balbharati Marathi Book) 'लोकनृत्य' धड्यावरून नव्या वादाला सुरुवात होण्याचीशक्यतानिर्माणझालीआहे. बालभारती ने मराठी पाठ्यपुस्तकातील धड्यात एकूण पाच लोकनृत्यांचा समावेश केला आहे , त्यापैकी पाच पैकी केवळ एक महाराष्ट्रातील, तर चार इतर राज्यांतील लोकनृत् यांचा समावेश करण्यात आला आहे . महाराष्ट्रातील लावणी, लेझीम, धनगरी गजा, गोंधळ, कोळी नृत्य, पोवाडा यांसारख्या समृद्ध लोकपरंपरेला पुरेसे स्थान न दिल्याची जेष्ठ साहित्यिक श्रीपाद भालचंद्र जोशीसह शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक आणि सांस्कृतिक जाणकारांनी यावर नाराजी व्यक्त केली.
Balbharati Marathi Book : जेष्ठ साहित्यिक श्रीपाद भालचंद्र जोशींचं मुख्यमंत्र्यांना पत्र; नेमकं प्रकरण काय?
दरम्यान, विद्यार्थी सहाव्या ईयत्तेत शिकत असता राज्यातील विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरावर महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीची अधिक व्यापक ओळख करून देणे आवश्यक होते, प्रत्येक विभागानुसार लोकनृत्याचा समावेश करता आला असता, तसे झाले नसल्याने रिजॉइंडर जोडून पाठ्यपुस्तकात सुधारणा करावी, अशी मागणी जेष्ठ साहित्यिक श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे. या धड्याला घेवून राज्य शैशानिक संशोधन परिषद व भालभारती यांना देखील याचा खुलासा केला नसल्याचे त्यावर देखील त्यांनी आक्षेप नोंदविला आहे. यापूर्वीही इयत्ता तिसरीच्या पुस्तकात भिडेवाड्याचा उल्लेख "महाराष्ट्रातील पहिली शाळा" असा करण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता. इतिहासानुसार भिडेवाडा ही देशातील पहिली मुलींची शाळा असल्याचा आक्षेप नोंदवण्यात आला होता. त्यानंतर बालभारतीने संबंधित मजकुरात दुरुस्ती करण्याची घोषणा केली होती. आता लोकनृत्याच्या धड्यामुळे पुन्हा एकदा बालभारतीच्या अभ्यासक्रमाला घेवून राज्य सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
Bhandara : भंडारा ते पंढरपूर 7 सायकलपटूंची 750 किलोमीटरची सायकलवारी
पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी आणि भंडाराकरांना निरोगी, सुदृढ, आर्थिक संपन्नता, भरभराटी मिळावी आणि शेतकरी राजाचं पीकपाणी चांगलं राहून त्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी भंडाऱ्यातील ७ सायकलपटूंची आज सकाळी पंढरपूरच्या दिशेनं सायकलवारी निघाली. भंडारा बायसिकल असोसिएशनचे हे सायकलपटू भंडारा ते पंढरपुर हा ७५० किलोमीटरचा प्रवास ६ दिवसात पूर्ण करणार आहेत. भंडारा शहराचं आराध्य दैवत असलेल्या श्री बहिरंगेश्वर मंदिरातून ही सायकलवारी निघाली. यावेळी मोठ्या प्रमाणात भंडाराकर उपस्थित होते. भंडारा शहराच्या प्रमुख चौकांमध्ये रिंगण घालून या सायकलवारीला रवाना करण्यात आलं.
इतर महत्वाच्या बातम्या
Author : तुषार कोहळे

