Dailyhunt
Bank Holiday: 1 मे रोजी बँका बंद राहणार, शेअर बाजाराला सुट्टी असणार, जाणून घ्या कारण, सुट्टी कशामुळं असणार?

Bank Holiday: 1 मे रोजी बँका बंद राहणार, शेअर बाजाराला सुट्टी असणार, जाणून घ्या कारण, सुट्टी कशामुळं असणार?

ABP माझा 1 week ago

 शुक्रवारी म्हणजेच उद्या 1 मे रोजी देशातील बहुतांश शहरांमध्ये बँका बंद राहणार आहेत. याशिवाय शेअर बाजार देखील बंद राहील. बीएसएई आणि एनएसईवर देखील कोणत्याही प्रकारचं ट्रेडिंग होणार नाही.

बँका बंद असल्यानं बँकेतील ऑफलाईन कामकाज बंद राहील.

1 मे 2026 रोजी बुद्ध पौर्णिमा आणि कामगार दिन असल्यानं यानिमित्तानं बँकांना सुट्टी असणार आहे. सर्व राज्यातील सरकारी आणि खासगी क्षेत्रातील बँकांना सुट्टी असेल. या दरम्यान यूपीआय, मोबाइल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंग आणि एटीएम सेवा सुरु राहतील.

महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं भारतीय शेअर बाजाराला सुट्टी आहे. बीएसई आणि एनएसईची मुख्य कार्यालयं मुंबईत असल्यानं या दिवशी सुट्टी देण्यात आली आहे. यामुळं शेअर बाजाराला 1 मे रोजी सुट्टी असेल.

मे महिन्यात साप्ताहिक सुट्टीनिमित्त बँका दुसरा शनिवार, चौथा शनिवार आणि रविवारी बँका बंद असतील. 3 मे, 9 मे, 10 मे, 17 मे, 23 मे, 24 मे आणि 31 मे या दिवशी साप्ताहिक सुट्टीनिमित्त बँका बंद असतील.

1 मे रोजी बँका महाराष्ट्र दिन, बुद्धपौर्णिमा, कामदार दिवस, पंडित रधुनाथ मुर्मू जयंतीनिमित्त बंद असेल. 16 मे रोजी काही राज्यांचे स्थापना दिवस असल्यानं बंका बंद असतील. 26 मे रोजी काझी नजरुल इस्लाम जयंतीनिमित्त बँका बंद राहतील. 27 आणि 28 मे रोजी बँका बकरी ईद निमित्तानं बंद असतील.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha