Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
BCCI : आयर्लंडसह इंग्लंडच्या दौऱ्यात भारतीय संघाची कामगिरी खराब, BCCI अॅक्शन मोडमध्ये, आज होणार मोठा निर्णय?

BCCI : आयर्लंडसह इंग्लंडच्या दौऱ्यात भारतीय संघाची कामगिरी खराब, BCCI अॅक्शन मोडमध्ये, आज होणार मोठा निर्णय?

ABP माझा 1 week ago

BCCI Meeting News : भारतीय क्रिकेटच्या संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे,. श्रीलंका दौरा संपताच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI अॅक्शनमोडमध्ये आले आहे. आज BCCI ची महत्वाची बैठक होणार आहे.

गेल्या काही दौऱ्यात भारताच्या खराब झालेल्या कामगिरीच्या संदर्भात ही महत्वाची बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यतचा देखील वर्तवण्यात येत आहे.

या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, आज होणाऱ्या BCCI च्या बैठकीत महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. यामध्ये गेल्या काही दौऱ्यात भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर खेळाडूंच्या दुखापती संदर्भात, त्याचबरोबर भारतीय संघाचा आगामी न्यूझीलंडचा दौरा होणार आहे. या दौऱ्यासंदर्भात देखील कशी रणनिती आखता येईल याबाबतची चर्चा आजच्या बैठकीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीला भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर उपस्थित राहणार आहे. त्याचबरोबर निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर तसेच व्ही व्ही एस लक्ष्मण यांच्यासह अनेक पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.

आयर्लंडसह इंग्लंडच्या दौऱ्यात भारतीय संघाची कामगिरी खराब

गेल्या दोन मालिांमध्ये भारतीय संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. यामध्ये आयर्लंडविरुद्धची मालिका आणि इंग्लंडविरुद्धची मालिका यांचा समावेश आहे. आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारताला 0-2 ने पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. तर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत 0-4 असा पराभव सहन करावा लागला आहे. यामुळं भारतीय क्रिकेट नियामक मंडळ सध्या अॅक्शन मोडमध्ये आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यासंदर्भात आज महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत नेमके कोणते निर्णय घेतले जाणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. संघामध्ये काही बदल होणार का? याबबतची देखील उत्सुकता आहे.

या सर्वांचा सहभाग फिटनेसवर अवलंबून असणार

दरम्यान, अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी होणाऱ्या 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा आणि नितीश कुमार रेड्डी या चार खेळाडूंची निवड झाली आहे. मात्र, या सर्वांचा सहभाग फिटनेसवर अवलंबून असणार आहे. हे सर्व खेळाडू फीट आहेत की नाहीत, यावर देखील या बैठकीत चर्चा होणार आहे. दुखापतग्रस्त झालेला हार्दिक पांड्या अद्याप स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर आहे. आगामी 2027 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी त्याच्या सहभागाच्या संदर्भात देखील चर्चा होम्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Author : गणेश लटके

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha