Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Bhau Kadam On Shooting And Fmaily Time: भाऊ कदम काम नसताना काय करतात? 'त्या' प्रश्नावर म्हणाले, 'घरी बसल्यावर अनेक विचार...'

Bhau Kadam On Shooting And Fmaily Time: भाऊ कदम काम नसताना काय करतात? 'त्या' प्रश्नावर म्हणाले, 'घरी बसल्यावर अनेक विचार...'

ABP माझा 1 week ago

Bhau Kadam On Shooting And Fmaily Time: 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) मधून आपल्या विनोदी शैलीनं घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे, भाऊ कदम (Bhau Kadam). आपली मेहनत, उत्तम अभिनय आणि प्रेक्षकांना खळखळून हसवण्याच्या ताकदीच्या जोरावर भाऊ कदम यांनी मराठी रसिक-प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय.

फक्त टीव्ही शो नाहीतर, भाऊ कदम वेब सीरिज (Web Series), सिनेमे (Movies) आणि नाटकांतही काम करतात. सध्या त्यांचं नवं नाटक रंगभूमीवर आलंय. 'पहिली लग्नाची, दुसरी प्रेमाची', असं या नाटकाचं नाव.

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाऊ कदम यांनी त्यांच्या नव्या नाटकाबाबत सांगितलं. 'तारांगण'शी बोलताना भाऊ कदम यांनी नव्या नाटकात नवीन पिढीबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला. तसेच, याव्यतिरिक्त त्यांनी काम आणि फॅमिली टाईम यावरही गप्पा मारल्यात. जेव्हा शुटिंग नसतं, त्यावेळी भाऊ कदम काय करतात? यावर बोलताना भाऊ कदम यांनी त्यांच्या फॅमिली टाईमबाबत सांगितलं.

भाऊ कदम नेमकं काय म्हणाले? (Actor Bhau Kadam On Fmaily Time)

भाऊ कदम बोलताना म्हणाले की, "वेब सीरिज, नाटक, सिनेमात काम करीत असताना मधे वेळ असतो. त्यावेळी मी आराम करतो. मी कुठे जात नाही. शनिवार-रविवारी नाटक येतं. त्यामुळे मला इतर नाटकं बघायलाही मिळत नाहीत. आता दोन-दोन नाटकांचे प्रयोग सुरू झाल्यानंतर माझी धावपळ होणार. पण, काम करत राहणं मला ऊर्जा देतं. घरी बसलं, तर अनेक विचार येऊ शकतात. आपले खूप कलाकार आहेत. त्यांना टेन्शन येतं की, चार महिने किंवा एक-दोन वर्षं बिझी होतो. आता पुढे काय, असा त्यांना प्रश्न पडतो. पण, मधल्या वेळेत असं टेन्शन घेऊ नका. काम मिळणार. आता काही दिवसांनी मला काम मिळालं नाही, तर टेन्शन घेण्यात काही अर्थ नाही. आपण दुसरं काहीतरी करीत राहिलं पाहिजे..."

"मी सिनेमे बघतो. फार कमी वेळा मी बाहेर जातो, मी घरीच जास्त असतो. घरी असलो की, बाकीची कामं करतो. मला जितका वेळ मिळेल तितका मी माझ्या क्षेत्राशी काय निगडित आहे, ते बघत असतो...", असं भाऊ कदम म्हणाले.

फॅमिली टाईमबाबत बोलताना भाऊ कदम म्हणाले की, "मी बायकोबरोबर शॉपिंगला जातो; पण तिथे लोक ओळखतात, गर्दी करतात. कधी कधी पत्नी म्हणते की, तुम्ही येऊ नका, लोक असतात. मी त्यांच्याबरोबर पिकनिकला जातो. मी फॅमिली लाईफ जगतो..."

Badshah Marathi Debut Rap Song: एकीकडे घटस्फोट घेतल्याचं सांगितलं, तर दुसरीकडे रॅपर बादशाहनं थेट महाराष्ट्रासाठी प्रेमपत्र लिहिलंय; नेमकं काय घडलंय?

Author : एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha