Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Bhuvneshwar Kumar : खतरनाक क्लास असलेल्या गोलंदाजाची वर्ल्डकपमध्ये एन्ट्रीची चर्चा; भुवनेश्वर कुमारने पहिल्यांदाच बोलला, नेमकं काय म्हणाला? सगळेच झाले भावूक

Bhuvneshwar Kumar : खतरनाक क्लास असलेल्या गोलंदाजाची वर्ल्डकपमध्ये एन्ट्रीची चर्चा; भुवनेश्वर कुमारने पहिल्यांदाच बोलला, नेमकं काय म्हणाला? सगळेच झाले भावूक

ABP माझा 1 week ago

Bhuvneshwar Kumar ODI World Cup 2027 Team India : 2027 च्या आयसीसी वनडे वर्ल्डकपसाठी (ODI World Cup 2027) भारतीय संघात पुन्हा एकदा स्विंग किंग भुवनेश्वर कुमारची सरप्राईज एन्ट्री होणार का?

दिग्गज खेळाडू रविचंद्रन अश्विनने 2027 च्या विश्वचषकासाठी भुवनेश्वरच्या नावाची शिफारस केल्यानंतर क्रिकेट वर्तुळात अचानक खळबळ उडाली आहे. 2022 पासून भारतीय संघातून बाहेर असलेला भुवी पुन्हा एकदा निळ्या जर्सीमध्ये दिसणार या चर्चेने वेग घेतला असतानाच, अखेर खुद्द भुवनेश्वर कुमारने यावर मनमोकळेपणाने भाष्य केले.

संघात स्थान मिळत नसल्याची कोणतीही खंत नसल्याचे सांगताना, ही वस्तुस्थिती स्वीकारण्यात आपल्या कुटुंबाची सर्वात मोठी भूमिका असल्याचे त्याने स्पष्ट केले. 36 वर्षीय भुवनेश्वरने भारताकडून अखेरचा सामना 2022 मध्ये खेळला होता. त्यानंतर त्याला राष्ट्रीय संघात संधी मिळालेली नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या अधिकृत पॉडकास्टमध्ये बोलताना भुवनेश्वर म्हणाला, "मी आज खूप आनंदी आहे आणि त्याचं संपूर्ण श्रेय माझ्या कुटुंबाला जातं. आमच्या घरी क्रिकेटबद्दल कधीच चर्चा होत नाही. मी पुन्हा भारतीय संघात येईन का, माझी निवड का झाली नाही किंवा काय चूक झाली, यावर आम्ही कधीच बोलत नाही. त्यामुळे मला कोणतीही खंत राहिली नाही."

संघाबाहेर पडल्यानंतर विचार बदलतात

भुवनेश्वरने सांगितले की, जेव्हा एखादा खेळाडू संघाचा महत्त्वाचा भाग असतो तेव्हा सर्वजण देश प्रथम असे म्हणतात. मात्र, संघाबाहेर गेल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. "जेव्हा तुम्ही संघाचा कोअर सदस्य असता, तेव्हा संघच सर्वात महत्त्वाचा वाटतो. पण जेव्हा तुम्ही संघात नसता, तेव्हा 'मी अजूनही तिथे असायला हवं होतं' असा विचार मनात येतो. मात्र मी हे वास्तव स्वीकारलं आहे," असे तो म्हणाला.

'बदल हा खेळाचाच भाग आहे'

भारतीय संघातील बदलांविषयी बोलताना भुवनेश्वर म्हणाला की, प्रत्येक पिढीनंतर नवे खेळाडू येणारच आणि हे क्रिकेटच्या प्रवासातील नैसर्गिक चक्र आहे. "मला माहीत आहे की बदल हा खेळाचा भाग आहे. प्रत्येक पिढी बदलते. असा अनुभव घेणारा मी पहिला खेळाडू नाही आणि शेवटचाही नाही. माझं कुटुंब कायम माझ्या पाठीशी उभं राहिलं. मी जिथे आहे तिथे समाधानी आहे. भारतासाठी खेळण्याचं स्वप्न मी आधीच पूर्ण केलं आहे. पुन्हा संधी मिळाली तर नक्की आनंद होईल, पण तीच माझी एकमेव ध्येय राहिलेली नाही," असे त्याने सांगितले.

'आजही क्रिकेट खेळतो, कारण या खेळावर प्रेम आहे'

सध्या आयपीएल, देशांतर्गत क्रिकेट आणि उत्तर प्रदेश टी-20 लीगमध्ये खेळत असलेल्या भुवनेश्वरने सांगितले की, आता तो केवळ क्रिकेटवरील प्रेमामुळे खेळतो. "मी अजूनही आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेट खेळतो कारण मला हा खेळ मनापासून आवडतो. फिटनेस आणि शिस्त कायम राखावी लागते हे मला माहीत आहे. मी नियमित क्रिकेट खेळतो, पण त्याचबरोबर शरीराला विश्रांती आणि पुनर्बांधणीसाठी पुरेसा वेळही देतो," असे तो म्हणाला.

'आता खऱ्या अर्थाने खेळाचा आनंद घेतो'

करिअरच्या सुरुवातीच्या काळात आणि आताच्या विचारांमध्ये मोठा फरक असल्याचेही भुवनेश्वरने नमूद केले. "तरुणपणी प्रत्येकजण म्हणतो की मला क्रिकेटवर प्रेम आहे. पण आता मला खरंच समजलं आहे की आपल्या नियंत्रणात असलेल्या गोष्टींवरच लक्ष केंद्रित करावं, अनावश्यक विचार करू नयेत आणि केवळ खेळाच्या आवडीसाठी मैदानात उतरावं. आज मी या गोष्टी खऱ्या अर्थाने अनुभवत आहे," असे भावनिक शब्दांत भुवनेश्वर कुमारने सांगितले.

Jasprit Bumrah Ind vs SL Test : ...अन् भारताचं सर्वात मोठं शस्त्रच निकामी झालं! श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेतून जसप्रीत बुमराह OUT, नेमकं काय घडलं?

Author : किरण महानवर

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha