नंदुरबारमधील नवापूर परिसरात बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई सुरू केली आहे.
१ मे ते ४ मे दरम्यान अवघ्या ४ दिवसांत ८ पोल्ट्री फार्ममधील तब्बल १,९३,६६७ पक्ष्यांचे किलिंग करण्यात आली आहे.
८ लाखांहून अधिक अंडी नष्ट करण्यात आली आहेत.
२१.२२ मेट्रिक टन पशुखाद्य जमिनीत गाडून नष्ट करण्यात आल्या आहेत.
पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. संजय खाचणे यांनी ही माहिती दिली आहे.
संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाची तातडीची आणि कठोर पावले उचलली जात आहेत.
परिसरात सतर्कतेचा इशारा, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

