Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बॉलिवूडवर दु:खाचा डोंगर;  प्रसिद्ध दिग्दर्शकाचे निधन, सलमान खान झाला भावूक, पोस्ट शेअर करुन फिल्ममेकरच्या पत्नीलाही दिला धीर

बॉलिवूडवर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध दिग्दर्शकाचे निधन, सलमान खान झाला भावूक, पोस्ट शेअर करुन फिल्ममेकरच्या पत्नीलाही दिला धीर

ABP माझा 1 week ago

Salman Khan Pays Tribute to Kuku Kohli: बॉलिवूडमधील दिग्गज फिल्ममेकर कुकू कोहली (Kuku Kohli) यांचं निधन झालं आणि संपूर्ण सिनेसृष्टी शोकसागरात बुडाली. 25 ऑगस्ट रोजी त्यांचं निधन झालं असल्याची माहिती आहे.

वयाच्या 77 व्या वर्षी त्यांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला होता. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या विधीला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली होती. कुकू कोहली यांची पत्नी अरुणा ईराणी (Aruna Irani) यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळल्यामुळे त्यांना अश्रु अनावर झाले. आता बॉलिवूडमधील सुपरस्टार सलमान खानने सोशल मीडियात आपले दु:ख व्यक्त केले आहे. सलमाना खानने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर कुकू कोहली यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने आपल्या पोस्टच्या माध्यमातून अभिनेत्री अरुणा इराणी यांनाही धीर दिला आहे.

सलमान खानची कुकू कोहलींसाठी भावूक पोस्ट (Salman Khan pays tribute to Kuku Kohli)

कुकू कोहली यांच्या निधनानंतर संपूर्ण सिनेइंडस्ट्री शोकसागरात बुडाली आहे. सलमान खाननेही कुकू कोहली यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सलमानने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर कुकू कोहली यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्याने कुकू कोहली यांच्या पत्नी, अभिनेत्री अरुणा ईराणी यांनाही धीर दिला आहे. सलमानने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, 'कुकूजी.. तुमच्या आत्म्यास शांती लाभो. अरुणा जी, माझ्या संवेदना तुमच्यासोबत आहेत. या कठीण काळात देव तुम्हाला शक्ती देवो...', असं सलमान खानने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. कुकू कोहली यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. सध्या सलमान खानची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

कुकू कोहली यांनी 1999 साली प्रदर्शित झालेल्या 'फुल और काँटे' या सिनेमाद्वारे अजय देवगणला बॉलिवूडमध्ये लाँच केले होते. 'फुल और काँटे' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या सिनेमासाठी खास अजय देवगणला फिल्मफेअर बेस्ट मेल डेब्यू अवॉर्डही मिळाले. 'फुल और काँटे' या सिनेमामुळे अजय देवगणला खरी ओळख मिळाली. अभिनेता रातोरात प्रकाशझोतात आला होता. कुकू कोहली यांच्या निधनानंतर अजय देवगण प्रचंड दु:खी होता. अभिनेत्याने आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. अजय देवगणने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, 'काही लोक आपल्या आयु्ष्याची दिशा कायम बदलून टाकतात. कुकू कोहलीजी माझ्या आयुष्यातील अशीच एक व्यक्ती होती. माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी मी कायम तुमचे आभारे राहेन... तुमची खूप आठवण येत राहिल.. कुकू जी.. ओम शांती..'

कुकू कोहली दिग्दर्शित'फुल और काँटे' या सिनेमात अजय देवगण व्यतिरिक्त मधू, अरुणा ईराणी, जगदीप, अमरीश पूरी, यांसारख्या दिग्गज कलाकारांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्ट्सनुसार, या सिनेमाने वर्ल्डवाईड 11.50 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. हा सिनेमा आपण ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडीओवरही पाहू शकता.

इतर बातम्या:

Toxic Review: 4 वर्षांची वाट पाहायला लावून यशने दिला टॉर्चर; ॲक्शन खतरनाक, पण स्टोरी फालतू! 'टॉक्सिक' नक्की कुठे फसली?

Author : भाग्यश्री कांबळे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha