हॉलिवूडचा बहुप्रतिक्षित 'स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे' (Spider-Man: Brand New Day) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत असून, अवघ्या तीन दिवसांतच त्याने तुफान कमाई केली आहे.
थिएटरमध्ये स्पायडर-मॅन पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी होत आहे.
सॅकनिल्कच्या अहवालानुसार, चित्रपटाने तिसऱ्या दिवशी 70.25 कोटी रुपयांची कमाई केली. देशभरात चित्रपटाचे 17,703 शो लागले होते. तर एकूण 77 टक्के ऑक्युपन्सी नोंदवण्यात आली.
या चित्रपटाच्या इंग्रजी आवृत्तीने 40.60 कोटी रुपये, हिंदीने 23 कोटी रुपये, तमिळ 3.75 कोटी रुपये, तेलुगू आवृत्तीने 2.75 कोटी रुपये कमावले. तर कन्नडमध्ये 7 लाख रुपये आणि मल्याळममध्ये 8 लाख रुपये इतकी कमाई झाली.
अवघ्या तीन दिवसांत चित्रपटाने भारतात 180.20 कोटी रुपयांची नेट, तर 215.47 कोटी रुपयांची ग्रॉस कमाई केली आहे.
स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे' हा चित्रपट 30 जुलै 2026 रोजी भारतात प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन डेस्टिन डॅनिएल क्रेटन यांनी केले आहे.
भारतात स्पायडर-मॅनचा मोठा चाहतावर्ग असल्याने चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

