Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Chandrapur Crime News: नवऱ्याचा आजार बरा करायला भोंदूने ग्रहशांती, कालसर्पदोषाची पूजा सांगितली, पतीला सामान आणायला पाठवलं अन् पत्नीसोबत नको ते केलं, चंद्रपुरातील घटना

Chandrapur Crime News: नवऱ्याचा आजार बरा करायला भोंदूने ग्रहशांती, कालसर्पदोषाची पूजा सांगितली, पतीला सामान आणायला पाठवलं अन् पत्नीसोबत नको ते केलं, चंद्रपुरातील घटना

ABP माझा 1 week ago

चंद्रपूर : ग्रहशांती आणि कालसर्पदोष निवारणाच्या नावाने एका भोंदू महाराजाने 27 वर्षाच्या विवाहितेवर लैंगिक अत्याचार (Chandrapur Crime News) केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी पोलीस स्टेशन अंतर्गत उघडकीस आलेली आहे.

याप्रकरणी भीसी पोलिसांनी मुख्य आरोपी शुभम खंगार याच्यासह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. 27 वर्षीय पीडित महिलेच्या पतीची प्रकृती वारंवार बिघडत होती. त्यामुळे त्यांनी शुभम महाराजासोबत पूजेसाठी संपर्क केला. त्याप्रमाणे रविवारी मध्यरात्री ही पूजा पीडितेच्या घरी करण्यात आली मात्र आरोपींनी पीडित महिलेच्या पतीला पूजेचे सामान आणण्यासाठी बाहेर पाठवून त्या विवाहितेवर बलात्कार (Chandrapur Crime News) केला. त्यानंतर पिडीतेने ही बाब आपल्या पती व घरच्यांना सांगितल्यानंतर आरोपींविरोधात भीसी पोलीस स्टेशनमध्ये काल सकाळी तक्रार दाखल करण्यात आली. त्याप्रमाणे शुभम खंगार याच्यासह त्याला मदत करणारे त्याचे दोन साथीदार सचिन मोडक आणि तेजस वालकटे यांना अटक करण्यात आली असून भिसी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. (Chandrapur Crime News)

घरातील गृहशांती आणि कालसर्प दोष निवारणाच्या पूजेचं ढोंग भोंदूनं रचून...

मिळालेल्या माहितीनुसार घरातील गृहशांती आणि कालसर्प दोष निवारणाच्या पूजेचं ढोंग भोंदूनं रचून एका विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना चिमूर तालुक्यातील भिसी (Chandrapur Crime News) पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी घडली. याप्रकरणी भिसी पोलिसांनी ढोंगी महाराजासह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध लैंगिक अत्याचार, धमकी आणि इतर आरोपांखाली गुन्हा दाखल केला आहे. महाराज शुभम लटारी खंगार (वय २६, रा. मसाडा, ता. वरोरा) याच्यासह तिघांना अटक केल्यातील आरोपींची नावे आहेत. (Chandrapur Crime News)

पीडित महिलेच्या तक्रारीवरून भिसी पोलिसांनी आरोपींच्या विरोधात बीएनएच्या कलम ६४ (१), ३५१ (३) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भिसी पोलिस ठाण्याचे ठाणेदार मंगेश भोंगाळे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक किशोर मुळे करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या पतीची प्रकृती वारंवार बिघडत असल्याने तसेच कालसर्प दोष निवारणासाठी कुटुंबीयांनी जगन्नाथ महाराज भद्रभेष देवस्थानचे महाराज शुभम लटारी खंगार याच्याशी संपर्क साधला होता. त्यानुसार रविवारी (३० ऑगस्ट) दुपारी शुभम महाराज हा त्याचे साथीदार यांच्यासह पीडितेच्या घरी पूजा करण्यासाठी आला. मात्र आरोपींनी पीडित महिलेच्या पतीला पूजेचे सामान आणण्यासाठी बाहेर पाठवून त्या विवाहितेवर बलात्कार केला. (Chandrapur Crime News)

Author : सारंग पांडे, एबीपी माझा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha