Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Crime News: मुंबईतील लोकल ट्रेनच्या महिला डब्यात नराधम घुसला, मुलीला एकटं पाहून नको ते करण्याचा प्रयत्न, धाडसी मुलीने डोळ्यात बोटं घालून प्रतिकार केला अन्...; नेमकं काय घडलं?

Crime News: मुंबईतील लोकल ट्रेनच्या महिला डब्यात नराधम घुसला, मुलीला एकटं पाहून नको ते करण्याचा प्रयत्न, धाडसी मुलीने डोळ्यात बोटं घालून प्रतिकार केला अन्...; नेमकं काय घडलं?

Crime News: डहाणू रेल्वे स्थानकावरून (Dahanu Railway Station) पहाटेच्या सुमारास धावणाऱ्या डहाणू-बोरिवली मेमू रेल्वेमध्ये (Dahanu-Borivali MEMU Train) एका 20 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर (College Student) अचानक हल्ला झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.

तरुणीने प्रसंगावधान राखत अत्यंत हिमतीने आणि धाडसाने जोरदार प्रतिकार केल्यामुळे एक मोठा अनर्थ टळला आहे.

Crime News: महिला डब्यात घुसून नराधमाचे कृत्य

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 5.17 वाजता सुटणाऱ्या मेमू लोकलच्या महिला डब्यात ही पीडित तरुणी एकटीच प्रवास करत होती. डब्यात कुणीही नसल्याची संधी साधत अंदाजे 27 ते 28 वर्षांचा एक अज्ञात इसम अचानक महिलांच्या डब्यात घुसला. त्याने सुरुवातीला गाडी कुठे पोहोचली आहे, अशी विचारणा करून तरुणीचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तरुणी एकटी असल्याचे पाहून त्याने अचानक तिचा गळा दाबून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.

Crime News: डोळ्यात बोटे घालून तरुणीचा प्रतिकार; आरोपी पसार

अचानक उद्भवलेल्या या जीवघेण्या परिस्थितीत घाबरून न जाता तरुणीने अफाट धैर्य दाखवले. तिने स्वतःचा बचाव करण्यासाठी थेट संशयित आरोपीच्या डोळ्यांत बोटे घालून त्याला मागे ढकलले आणि जोरात आरडाओरड केली. तरुणीचा आवाज ऐकून लगतच्या डब्यातील आणि परिसरातील प्रवासी मदतीसाठी धावून आले. प्रवाशांनी संशयिताला जागीच पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र वाणगाव स्थानकाजवळ झालेल्या झटापटीनंतर आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला.

Crime News: आपत्कालीन नंबर आणि आरपीएफच्या प्रतिसादावर प्रश्नचिन्ह

या थरारक घटनेनंतर तरुणीने तातडीने 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, या क्रमांकावरून कोणतीही तत्काळ मदत न मिळाल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. याशिवाय, रेल्वे सुरक्षा दलाकडून देखील अपेक्षेप्रमाणे कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, अशा प्रकारच्या तक्रारी आणि संदेश सध्या सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. ऐन पहाटेच्या वेळी घडलेल्या या घटनेमुळे पश्चिम रेल्वेवरील महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे ऐरणीवर आला आहे. जीवघेण्या संकटातही तरुणीने दाखवलेल्या अफाट धैर्याचे आणि प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत असले, तरी रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

राज्य आणि देश-विदेशातील बातम्या; पाहा व्हिडीओ

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha