Dailyhunt
Crime Thriller on OTT: 2 तास 11 मिनिटांत काळजाचा थरकाप उडेल; OTT वरची 'ही' क्राईम थ्रिलर पाहून अंगावर काटा येईल

Crime Thriller on OTT: 2 तास 11 मिनिटांत काळजाचा थरकाप उडेल; OTT वरची 'ही' क्राईम थ्रिलर पाहून अंगावर काटा येईल

ABP माझा 2 weeks ago

OTT Crime Thriller: OTT वर क्राईम थ्रिलर पाहणाऱ्यांसाठी 1 मे खास ठरणार आहे. अवघ्या 2 तास 11 मिनिटांत काळजाचा थरकाप उडवणारी एक जबरदस्त फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही कथा फक्त थरारक नाही, तर अंगावर काटा आणणारी आणि मन हादरवून टाकणारी आहे.

तीन मुलींच्या आयुष्यात घडणाऱ्या भीषण घटनांभोवती फिरणारा हा चित्रपट तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवेल. प्रत्येक सीनमध्ये वाढत जाणारा तणाव, धक्कादायक वळणं आणि वास्तवाला भिडणारी मांडणी यामुळे ही फिल्म पाहताना श्वास रोखला जाईल. OTT वरील ही क्राईम थ्रिलर नक्कीच चुकवू नये अशी आहे. (Crime Thriller)

आंधळ्या प्रेमाची भीषण शिक्षा दाखवणारी कथा

या चित्रपटाचं नाव 'द केरळ स्टोरी 2' आहे, जो यावर्षी 27 फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. आता हा सिनेमा 1 मेला प्रेक्षकांना OTT वर पाहता येणार आहे. या चित्रपटाची कथा तीन मुलींभोवती फिरते. सुरेखा ही केरळची आहे, दिव्या ही राजस्थानमधील सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे, तर नेहा मध्य प्रदेशची आहे. तिघींचे पार्श्वभूमी वेगवेगळी असली तरी त्यांच्या आयुष्यात येणारा धोका मात्र एकच आहे. कथा त्यांच्या प्रेमापासून सुरू होते. त्या आपल्या प्रेमावर आंधळा विश्वास ठेवतात आणि त्यासाठी आपल्या कुटुंबाविरुद्ध बंड करतात. मुलांच्या बोलण्याला भुलून त्या घर सोडून त्यांच्यासोबत राहायला जातात. मात्र, काही काळानंतर त्यांच्यासमोर त्या मुलांचा भयानक चेहरा उघड होतो, जो पाहून त्यांच्या अंगावर काटा येतो.

कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर पाहता येणार?

2 तास 11 मिनिटांचा 'द केरळ स्टोरी 2' हा चित्रपट आता 1 मे 2026 रोजी ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात भारतातील काही भागांतील वास्तव दाखवण्यात आलं आहे, जिथे मुलींना फसवून अशा परिस्थितीत ढकललं जातं की, त्यातून बाहेर पडणं जवळपास अशक्य होतं. 'द केरळ स्टोरी 2'ची कथा अमरनाथ झा आणि विपुल अमृतलाल शाह यांनी लिहिली असून, दिग्दर्शन कामख्या नारायण सिंह यांनी केलं आहे. या चित्रपटात उल्का गुप्ता, ऐश्वर्या ओझा आणि अदिती भाटिया यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

Author : abp majha web team

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha