Dahi Handi 2026: माघाठाणे येथे गोकुळाष्टमी निमित्त पश्चिम उपनगरात लोकप्रिय असलेल्या दहीहंडी भव्य सोहळ्याचे आयोजन माघाठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे आणि नगरसेवक युवा सेना सचिव राज प्रकाश सुर्वे यांनी केले आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असून आपली ही मराठी भाषा टिकविण्यासाठी व रुजविण्यासाठी, मराठी भाषेची अस्मिता जपण्यासाठी तसेच मुंबईतील मराठी शाळा बंद पडत असून मराठी शाळा टिकविण्यासाठी, मातृभाषेतून मिळणाऱ्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी 'मातृभाषा शिक्षण जागर दहीहंडी' आयोजित केली आहे. याच निमित्ताने तसेच गोकुळाष्टमी 5 सप्टेंबरला येत असल्याने 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने गुणवंत शिक्षकांचा सन्मान सदर दहीहंडी महोत्सवात केला जाणार आहे. अशी अभिनव संकल्पना घेऊन आमदार प्रकाश सुर्वे व नगरसेवक राज प्रकाश सुर्वे माघाठाण्यात भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करीत आहेत. (Maghathane Dahihandi 2026)
माघाठाणे दहीहंडी महोत्सवातील प्रमुख आकर्षण प्रसिद्ध सिनेकलाकार संजय दत्त, अनिल कपूर, रवी किशन, राकेश बेदी तसेच सिनेतारका मल्लिका शेरावत आणि अनेक सिनेतारकांच्या उपस्थितीत सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत येथे गोविंदांचा थरार रंगणार आहे. सलामी देणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. या सोहळ्याला खास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित असतील. सदर महोत्सवात मराठी, हिंदी वाद्यवृंद व लोकनृत्य कार्यक्रम तसेच या महोत्सवास मराठी, हिंदी सिनेसृष्टीतील अनेक मान्यवर, अभिनेते व अभिनेत्री, गायक आवर्जून हजेरी लावणार आहेत.
मुंबईतील मराठी शाळा टिकविण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री फोडणार मातीची हंडी- (Devendra Fadnavis And Eknath Shinde Dahi Handi 2026)
एक हंडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दुसरी हंडी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे फोडणार असल्याची माहिती माघाठाणे विधानसभा मतदारसंघाचे स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे आणि नगरसेवक राज प्रकाश सुर्वे यांनी दिली. महाराष्ट्राच्या मातीत फुललेल्या मराठी संस्कृतीचा सुगंध तरुणाईत दरवळावा व तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी शिवसेना व तारामती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दहीहंडी महोत्सवाचे आयोजन न्यायालयाच्या निर्णयाधीन राहून, सर्व कायद्यांचे पालन करून, शनिवार दिनांक 5 सप्टेंबर 2026 रोजी देवीपाडा मैदान, एक्सप्रेस हायवेजवळ, बोरीवली (पूर्व) येथे आमदार प्रकाश सुर्वे आणि नगरसेवक राज प्रकाश सुर्वे यांनी केले आहे.
किती थर, किती बक्षीस?, A टू Z माहिती (Dahi Handi 2026)
दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदांचा उत्साह वाढविण्यासाठी येथे प्रसिद्ध सिनेकलावंत व सिनेतारका, गायक आदी मान्यवर खास उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार प्रकाश सुर्वे यांनी दिली. सलामी देणाऱ्या प्रत्येक दहीहंडी पथकास 5 थर - 5000, 6 थर - 7000, 7 थर - 9000, 8 थर - 30000, 9 थर - 125000 अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. विशेष प्रात्यक्षिके व मनोरे सादर करणाऱ्या पथकास 10000 ते 100000 रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच महिला गोविंदांच्या थरांसाठी विशेष बक्षिसे व प्रोत्साहनपर आकर्षक रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे. यावर्षीच्या दहीहंडी महोत्सवाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे या दहीहंडी महोत्सवातील दहीहंडी फोडण्याच्या शेवटच्या थराच्या शिक्षणाचा सर्व खर्च आमदार प्रकाश सुर्वे व नगरसेवक राज प्रकाश सुर्वे उचलणार आहेत, अशी माहिती राज सुर्वे यांनी दिली.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

