Dailyhunt
Devendra Fadnavis एकनाथ शिंदेंसोबत कुठलीही स्पर्धा नाही, आम्ही 'इन्फ्रा फॅमिली'; श्रेयवादाच्या लढाईवर मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?

Devendra Fadnavis एकनाथ शिंदेंसोबत कुठलीही स्पर्धा नाही, आम्ही 'इन्फ्रा फॅमिली'; श्रेयवादाच्या लढाईवर मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?

ABP माझा 1 week ago

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र-माझं व्हिजन कार्यक्रमात महाराष्ट्राच्या विकासावर आणि पायाभूत सुविधांच्या अनुषंगाने भाष्य केलं.

महाराष्ट्र राज्य हे 2029 साली ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी असलेलं राज्य असेल, महाराष्ट्र पुढील 4-5 वर्षात इतका पुढे जाईल, देशात कुणीच स्पर्धा करू शकणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री महोदयांनी व्यक्त केला. तसेच, पायाभूत सुविधांच्या अनुषंगाने होत असलेल्या श्रेयवादाच्या लढाईवर भाष्य करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत कुठलीही स्पर्धा नाही, असेही फडणवीसांनी सांगितले.

मुंबई-पुणे मिसिंग लिंकचे उद्या 1 मे महाराष्ट्र दिनी लोकार्पण होत आहे, त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात श्रेयवादाची स्पर्धा असल्याची चर्चा होत आहे. त्या अनुषंगाने फडणवीस यांनी कुठलीही स्पर्धा नसल्याचे स्पष्ट केले. आमची एकनाथ शिंदे यांच्यासोबत कुठलीही स्पर्धा नाही, आम्ही 'इन्फ्रा फॅमिली' मध्ये आहोत, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी विकासकामांचे श्रेय सगळ्यांचे असल्याचे सूचवले. आमच्या सरकारने सुरू केलेले प्रकल्प आमच्याच काळात पूर्ण होत आहेत, आमच्या श्रेयवादाचे कारण नाही. कार्यकर्त्यामध्ये सीमित बुद्धी असते, आम्ही इन्फ्रा फॅमिली आहोत, त्यामुळेच आमच्यात कुठलाही श्रेयवाद नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था यूएई किंवा सिंगापूरला मागे टाकेल.

'डॉलर'वर आमचे टार्गेट मागे पुढे होते. आम्ही आमच्या टार्गेटसाठी ऑन ट्रॅक आहोत. पुढील काही वर्षात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था यूएई किंवा सिंगापूर यांना मागे टाकेल. कारण, व्हिजन इन अँक्शनमध्ये आम्ही आहोत. महाराष्ट्र पुढील 4-5 वर्षात इतका पुढे जाईल, देशात कुणीच स्पर्धा करू शकणार नाही. राज्य सरकारने घेतलेल्या 100 दिवस कार्यक्रमामुळे कामाची क्षमता वाढली आहे. ज्या 20 गोष्टींसाठी जनतेला यावं लागते, त्या सेवा आम्ही AI च्या मदतीने सुलभ करू असे फडणवीसांनी सांगितले. मेट्रो 3 मुळे 35 टक्के ट्रॅफिक कमी झालं. या मेट्रोसाठी विरोध ठाकरेंनी केला, पण सुप्रीम कोर्टानेही योग्य तोडगा काढला, असे फडणवीस यांनी सांगितले. 2030 साली 52 टक्के ऊर्जा रिन्यूएबल होईल. महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे, ज्याने एनर्जी प्लॅनिंग केलंय. आपल्या ऊर्जा खात्याला 52 अवॉर्ड मिळाले असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

शरद पवारांचे सातत्या शिकण्यासारखे (Devendra Fadnavis on sharad pawar)

माझे सगळे मंत्री माझे Vision राबवत आहोत. शरद पवारांचे सातत्य हे शिकण्यासारखे आहे. शरद पवारांकडे कठोर निर्णय घेण्याची क्षमता आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी कौतुक केलं. तसेच मराठी माणूस पंतप्रधान बनेल. पण, 2029, 2034 किंवा 2039 कधी बनेल माहिती नाही, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

हेही वाचा

राष्ट्रवादीचे आमदार फोडणार नाही, देवेंद्र फडणवीसांनी माझा व्हिजनमध्ये स्पष्ट सांगितलं, खरात, TCS प्रकरणावरही मोठं विधान

Author : महेश गलांडे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha