Devendra Fadnavis नागपूर : रामदेव बाबा विद्यापीठ (Ramdeobaba University) येथे आज AI लॅबचं उद्घाटन (Inauguration of the AI Centre of Competency) होतंय याचा मला फार आनंद आहे. बनवारीलाल पुरोहित यांनी रामदेव बाबा विद्यापीठाची स्थापना केली.
त्यासोबत विदर्भ आणि देशात अग्रणी संस्था म्हणून त्यांनी कार्य केले. खाजगी संस्था असतानाही देशातील चांगली संस्था म्हणून रामदेव बाबा विद्यापीठाकडे पाहिले जाते. येथे केवळ शिक्षण नाही तर संशोधनाला बळ दिलं, त्यामुळे हे विद्यापीठ लवकरच देशातील विद्यापीठात समाविष्ट होईल. अशीअपेक्षाव्यक्तकरतराज्याचेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीविविधविषयांवरभाष्यकेलंय. तर तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल असेही मुख्यमंत्री म्हणाले. नागपूरच्या रामदेव बाबा अभिमत विद्यापीठात विकसित करण्यात आलेल्या अद्ययावत AI लॅब तसेच सुपर कम्प्युटरच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतहोते.
Devendra Fadnavis: आमच्या शिक्षणसंस्थांनी संशोधन करण्याची हीच योग्य वेळ
AI हे भविष्य आहे. आमच्या शिक्षणसंस्थांनी संशोधन करण्याची हीच योग्य वेळ आहे. रोबोटिक्स, बायो टेक्नॉलॉजी आणि इतर सर्व क्षेत्रात तंत्रज्ञानांमुळे बदल होत आहे. तसेच AI तीव्रतेने सर्व काही बदलत आहे. AI क्षेत्रातील एका अत्यंत मोठ्या तज्ञ व्यक्तीने मला सांगितले की येणाऱ्या काळात रोजगाराचं स्वरूप बदलेल. किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AIमुळे बदलेल. रोजगार जाणार नाही, मात्र त्याचे स्वरूप बदलेल. असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Devendra Fadnavis: AI ची कमाल, पिकांच्या एका फोटो द्वारे शेतकऱ्याला अचूक सल्ला आणि सूचना
स्वित्झर्लंडमध्ये वर्ष 2000 नंतर जन्मणारा प्रत्येक बालक किमान शंभर वर्ष जगेल, अशा स्वरूपात त्यांनी हेल्थकेअर सिस्टम विकसित केले आहे.. आपल्या देशात ही वयोमान वाढत आहे. महाराष्ट्रात सरकारने "महाविस्तार" नावाचे AI powered अँप विकसित केले आहे. त्याद्वारे महाराष्ट्राचे शेतकरी त्यांच्या स्थानिक बोली भाषेत तज्ञांशी संवाद साधून समस्या आणि त्यावरील उपाय विचारू शकतात. पिकांच्या एका फोटो द्वारे शेतकऱ्याला अचूक सल्ला आणि सूचना मिळू शकता. हे AI चे कमाल आहे. असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Devendra Fadnavis: रोजगार मिळवू शकतील असे शिक्षित तरुण निर्माण करायचेआहेत
नवीन शिक्षण धोरणात बाजारात रोजगार कशा स्वरूपात उपलब्ध आहे, त्या प्रमाणे शिक्षण संस्थांना अभ्यासक्रम निश्चित करण्यात सांगितले गेले आहे. आपल्याला स्नातक निर्माण करायचे नाही, तर रोजगार मिळवू शकतील असे शिक्षित तरुण निर्माण करायचे आहे. रामदेव बाबा अभिमत विद्यापीठात तसेच केले जात असल्याचेहीमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीसम्हणाले. तर रामदेव बाबा विद्यापीठाची आज उद्घाटन होत असलेली AI प्रयोगशाळा या क्षेत्रात उच्च स्तरीय मनुष्यबळ निर्माण करेल, अशी अपेक्षा आहे, असेहीतेम्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
Author : रजत वशिष्ठ, एबीपी माझा

