Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Dharashiv Politics : 'एक कोटींचा गद्दार... हा शिक्का पुसला जाणार नाही!' ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश करताच धाराशिवमध्ये बॅनरबाजी

Dharashiv Politics : 'एक कोटींचा गद्दार... हा शिक्का पुसला जाणार नाही!' ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश करताच धाराशिवमध्ये बॅनरबाजी

ABP माझा 1 week ago

 Dharashiv Uddhav Thackeray Corporator Joins Eknath Shinde Shiv Sena :धाराशिवमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुरु असलेली गळती थांबायचं नाव घेत नाहीये. धाराशिव नगर परिषदेच्या चार नगरसेवकांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केलाय.

 असे असताना, पक्ष प्रवेशानंतर धाराशिवमध्ये नगरसेवकांच्या विरोधात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली असून या बॅनरची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आता रंगू लागली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश होताच त्याचे पडसाद आता धाराशिवमध्ये उमटताना बघायला मिळत आहे.

एक कोटींचा गद्दार हा शिक्का पुसायचा नाही, मतदाराला धोका, आमचं मत आम्हाला परत द्या, असा आशय असलेले बॅनर धाराशिवमध्ये झळकले असून या बॅनरची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

एकीकडे, धाराशिव शहराच्या राजकारणात सध्या नगरसेवकांच्या पळवापळवीवरून मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे गटाच्या नगरसेवकांना आपल्या पक्षात घेण्यासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये चढाओढ सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघालेले नगरसेवक अचानक माघारी फिरले आणि थेट ठाण्यात पोहोचत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत दाखल झाले. दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटाचे पाच नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती.

दरम्यान, भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांच्या नेतृत्वाखालील टीम या नगरसेवकांना घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाली होती. मात्र, पुणे जिल्ह्यातील इंदापूरपर्यंत पोहोचल्यानंतर या नगरसेवकांनी अचानक यू-टर्न घेतला. मुंबईऐवजी हे नगरसेवक पुन्हा धाराशिवला परतले.

त्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या माध्यमातून त्यांना थेट ठाण्याला नेण्यात आलं. अखेर काल उशिरा रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश झाला. त्यामुळे धाराशिवच्या राजकारणात या घडामोडीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha