Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Dhinchak Pooja: 'सेल्फी मैंने ले ली आज' फेम ढिंच्याक पूजाचं लग्न झालं; पतीसोबतचे फोटो शेअर, नवरदेव देखणा इतका की..

Dhinchak Pooja: 'सेल्फी मैंने ले ली आज' फेम ढिंच्याक पूजाचं लग्न झालं; पतीसोबतचे फोटो शेअर, नवरदेव देखणा इतका की..

ABP माझा 2 weeks ago

 Dhinchak Pooja wedding photos: 'सेल्फी मैंने ले ली आज' गाण्यातून प्रकाशझोतात येणारी ढिंच्याक पूजा (Dhinchak Pooja) हिनं आपल्या आयुष्यातील नव्या अध्यायाला सुरुवात केली आहे. तिनं गुपचूप उरकलं आहे.

या गायिकेने तिच्या पतीसोबतचे लग्नातील खास फोटो इन्स्टग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये गायिका आपल्या पतीसोबत दिसत आहे.

'सेल्फी मैंने ले ली आज', 'दिलों का शूटर', 'स्वैग वाली टोपी' आणि 'गाड़ी मेरी 2 सीटर' या गाण्यातून प्रकाशझोतात येणारी गायिका ढिंच्याक पूजा सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

ढिंच्याक पूजानं गुपचूप लग्न उरकलं आहे. तिनं आपल्या लग्नातील फोटोंचा व्हिडीओ तयार करुन शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ढिंच्याक पूजा आपल्या पतीसोबत दिसत आहे.

दरम्यान, अद्याप ढिंच्याक पूजाच्या नवऱ्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

व्हायरल पोस्टमध्ये ढिंच्याक पूजा लाल रंगाच्या लेहेंग्यामध्ये दिसत आहे. तिनं आपला लूक पूर्ण करण्यासाठी हेवी ज्वेलरी कॅरी केलं आहे. ब्रायडल मेकअपमध्ये ढिंच्याक पूजा सुंदर दिसत आहे.

स्टेजवर ढिंच्याक पूजासोबत एक तरुण दिसत आहे. त्यानं नवरदेवाचे कपडे परिधान केले आहेत. बरेच पोज देत दोघांनी फोटो काढले आहेत.

ढिंच्याक पूजानं पोस्टला लक्षवेधी कॅप्शन देखील दिलं आहे. 'माझ्या लग्नातील काही खास क्लिप्स, लवकरच मी आणखी काही फोटो शेअर करेन', असं तिनं म्हटलं.

यावरुन ढिंच्याक पूजाचं लग्न झालं आहे, हे कन्फर्म झालं आहे. अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये ढिंच्याक पूजाचं वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर, काहींनी तिला ट्रोलही केलं.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha