Divyanka Tripathi welcomes twin babies: टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिनं अलिकडेच जुळ्या मुलांना जन्म दिला.
माहितीनुसार, 25 मे रोजी तिनं जुळ्या मुलांना जन्म दिला.
बाळंतपणाच्या 4 दिवसांनंतर दिव्यांकाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलं. 29 मे रोजी अभिनेत्री आपल्या मुलांसोबत घरी जाताना दिसली.
घरी जाण्यापूर्वी दिव्यांका आणि तिचा पती विवेकने पापाराझींसोबत चर्चा केली. कॅमेऱ्यांसमोर दोघांनीही पोज दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची जुळी मुलंही होती.
अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. तिच्या चेहऱ्यावर ग्लो होता. दिव्यांका रिकाम्या हाताने रुग्णालयात गेली होती. पण 2 मुलांना घेऊन परतली. दिव्यांका आणि विवेक आपल्या मुलांसोबत नवी कोरी BMW कारमधून आले.
दिव्यांका आणि विवेक हे मुलांसोबत घराबाहेर पडताच, मुलांच्या आजीने आरती करुन, त्यांची दृष्ट काढली.
न्यू बॉर्न बेबींसाठी आजीचं प्रेम पाहून पापाराझी भारावले. 'सेलिब्रिटी असो किंवा सामान्य व्यक्ती, प्रत्येकाची आजी अशीच प्रेमळ असते', असं त्यांनी म्हटलं.
मुलांना जवळच्या घेतल्यानंतर दिव्यांकाला प्रचंड आनंद झाला. तिच्या चेहऱ्यावर ग्लो आणि आनंद दिसत होता. दोघांचेही कुटुंब आनंदात होते.
दिव्यांका आणि विवेकने 2016 साली लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या 10 वर्षांनंतर तिनं जुळ्या मुलांना जन्म दिला.

