Don 3 Ranveer Singh Ban: सध्या बॉलिवूडमध्ये (Bollywood News) 'डॉन 3' सिनेमाचं (Don 3 Movie) प्रकरण चांगलंय चर्चेत आहे. सिनेमाचं शुटिंग सुरू होण्यासाठी अगदीच हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच दिवस शिल्लक असतानाच मुख्य भूमिकेत झळकणाऱ्या रणवीर सिंहनं (Ranveer Singh) सिनेमातून माघार घेतली.
त्यामुळे दिग्दर्शक फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि रणवीर सिंह (Actor Ranveer Singh) यांच्यात वाद उफाळला. सध्या यावरुन रणवीर सिंहवर चोहिकडून टीकेची झोड उठली आहे. रणवीरनं असा तडकाफडकी निर्णय घेतल्यानं निर्मात्यांचं मोठं आर्थिक नुकसान झाल्याचा दावा केला जात आहे. फरहान अख्तर आणि त्यांचे सहनिर्माते रितेश सिधवानी हे रणवीर सिंहकडून नुकसानभरपाईची मागणी करत असल्याची चर्चा आहे. मात्र, रणवीरनं यास नकार दिल्याचं म्हटलं जात आहे. यामुळे सध्या वातावरण चांगलंय तापलं आहे.
रणवीर सिंह आणि फरहान अख्तर यांच्यातल्या वादाच्या जोरदार चर्चा रंगल्या असतानाच, सोमवारी FWICE नं रणवीर सिंहवर बंदी घातल्याच्या चर्चा रंगल्या. यानंतर त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सबाबतही विविध तर्कवितर्क सुरू झालेत. या घडामोडींमुळे रणवीर आणि फरहान यांच्यातील वाद आणखी चिघळल्याचं बोललं जातंय. आता या वादात बॉलिवूडचा सुपरस्टार समेट घडवून आणणार असल्याचं बोललं जातंय. बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खान यानं आता रणवीर सिंह आणि फरहान अख्तर यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतल्याचं सांगितलं जातंय.
रणवीर, फरहान यांच्यात भाईजान घडवून आणणार समेट? (Ranveer Singh On Farhan Akhtar)
बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, सलमान खान यानं रणवीर सिंह आणि फरहान अख्तर यांच्यात सुरू असलेली लढाई शांत करण्याचा निर्णय घेतला आहे. सलमानचं म्हणणं आहे की, दोघांनीही कोणताही तमाशा न करता, आपापले मुद्दे मांडावेत आणि आपापसांत प्रकरण मिटवून घ्यावं.
मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खान आणि रणवीर सिंह यांच्यात चांगले संबंध आहेत. तर, दुसरीकडे फरहान अख्तर यांच्या कुटुंबासोबतही सलमान खानचे चांगले संबंध आहेत. त्यांनी दोघांना फोन करुन सांगितलंय की, हे भांडण आपापसांत सोडवावं आणि तुमच्या भविष्यातल्या प्रोजेक्टवर याचा परिणाम होऊ देऊ नका.
भाईजान सलमान खाननं फरहानला सांगितलं की, क्रिएटिव्ह डिफ्रेंसेस असणं इंडस्ट्रीत काही नवं नाही. रणवीरसोबतही सलमान खाननं बराच काळ चर्चा केली आणि त्याचं म्हणणंही व्यवस्थित ऐकून घेतलंय. त्यामुळेच सलमान खानला रणवीर, फरहान यांच्यात समेट घडवून आणायचा आहे.
ABP माझाच्या बातम्या LIVE...
Author : एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क

