Dailyhunt
Drisyham 3 Teaser: मोहनलालच्या 'दृश्यम 3' टीझरने वाढवली धडधड! जुनं रहस्य उकरलं जाणार? 1 मिनिट 50 सेकंदाचा थरार

Drisyham 3 Teaser: मोहनलालच्या 'दृश्यम 3' टीझरने वाढवली धडधड! जुनं रहस्य उकरलं जाणार? 1 मिनिट 50 सेकंदाचा थरार

ABP माझा 2 weeks ago

Mohanlal Drishyam 3 Teaser: मोहनलालचा बहुचर्चित 'दृश्यम 3' अखेर चर्चेच्या शिखरावर पोहोचला आहे. चित्रपटाचा अधिकृत टीझर काल( 29 एप्रिल) सायंकाळी 5 वाजता रिलीज करण्यात आला असून, रिलीजपूर्वीच चाहत्यांमध्ये जबरदस्त उत्सुकता निर्माण झाली आहे.

पोस्टरमधून वाढला सस्पेन्स

टीझरपूर्वी रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये जॉर्ज कुट्टी हातात फावडा आणि शेतीची साधनं घेऊन दिसतो. हा त्याच्या 'सामान्य' इमेजचा संकेत मानला जातोय. पण चाहत्यांचं म्हणणं वेगळंच आहे…हा चित्रपट 21 मे 2026 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे, विशेष म्हणजे याच दिवशी अभिनेते मोहनलाल यांचा वाढदिवसही आहे. आधी 2 एप्रिलची तारीख ठरलेली होती, पण नंतर ती पुढे ढकलण्यात आली. या भागातही जुनी स्टारकास्ट कायम आहे. मीना, अन्सिबा हसन, एस्तेर अनिल, आशा शरथ, मुरली गोपी आणि सिद्दीकी भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

अजय देवगणचा दृश्यम 3 कधी येणार?

मोहनलाल यांच्या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर लगेचच, अजय देवगननेही त्याच्या फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागाची घोषणा केलेली. गेल्या वर्षी, 22 डिसेंबर 2025 रोजी, त्याने 'दृश्यम 3' चा टीझर प्रदर्शित केलेला. 1 मिनिट 13 सेकंदांच्या या टीझरमध्ये अजय देवगनचा एकपात्री संवाद आहे. तो म्हणतो, "जग मला अनेक नावांनी हाक मारतं, पण मला त्याची पर्वा नाही, कारण गेल्या सात वर्षांत जे काही घडलं, जे काही मी केलं, जे काही मी पाहिलं, जे काही मी दाखवलं, त्या सगळ्यामुळे मला एक गोष्ट समजली आहे. या जगात प्रत्येकाचं सत्य वेगळं असतं, प्रत्येकाचा हक्क वेगळा असतो. माझं सत्य, माझा हक्क फक्त माझं कुटुंब आहे. जोपर्यंत प्रत्येकजण थकून जात नाही, जोपर्यंत प्रत्येकजण पराभूत होत नाही, तोपर्यंत मी इथे एक पहारेकरी, एक रक्षक, एक भिंत म्हणून उभा राहीन, कारण ही कथा अजून संपलेली नाही. अंतिम भाग अजून यायचा आहे." अजय देवगण अभिनीत 'दृश्यम 3' हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटात तब्बू, श्रिया सरन आणि इशिता दत्ता दिसणार आहेत.

Author : abp majha web team

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha