Dailyhunt
Dwidwadash Yog 2026 : बुध-शुक्राची युती ठरणार गेमचेंजर; 11 एप्रिलला द्विद्वादश राजयोगाचा थेट राशींवर परिणाम, नोकरी, पैसा, करिअरमध्ये मिळणार भरघोस यश

Dwidwadash Yog 2026 : बुध-शुक्राची युती ठरणार गेमचेंजर; 11 एप्रिलला द्विद्वादश राजयोगाचा थेट राशींवर परिणाम, नोकरी, पैसा, करिअरमध्ये मिळणार भरघोस यश

ABP माझा 1 week ago

Dwidwadash Yog 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, द्विद्वादश योग (Dwidwadash Yog) हा ज्योतिष शास्त्रात फार विशेष योग मानला जातो. हा योग दोन ग्रहांच्या युतीने निर्माण होतो. द्रिक पंचांगानुसार, 11 एप्रिल रोजी बुध-शुक्र ग्रहांची युती होऊन द्विद्वादश योग निर्माण होणार आहे.

खरंतर, 11 एप्रिलला बुध ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. याच काळात शुक्र ग्रहसुद्धा मेष राशीत विराजमान असणार आहे.

याचाच अर्थ बुध ग्रह मीन राशीच्या दुसऱ्या चरणात आणि शुक्र ग्रह मेष राशीच्या दुसऱ्या चरणात विराजमान होणार आहे. यालाच द्विद्वादश राजयोग म्हणतात. या योगामुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. या लकी राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ फार लाभदायी असणार आहे. बुध ग्रह लाभ स्थानी असल्याने करिअरमध्ये पुढे जाण्याच्या अनेक संधी मिळतील. तसेच, तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ झालेली दिसेल. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला मिळतील. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नवीन नोकरीची संधी मिळेल. शुक्र ग्रहाच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख-शांती नांदेल.

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा योग चांगला ठरणार आहे. तुमच्यातील रचनात्मक क्षमता वाढलेली दिसेल. तसेच, मुलांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. या कालावधीत तुम्हाला पैशांशी संबंधित काही अडचणी असतील तर त्या सोडवता येतील. तुम्हाला चांगला धनलाभ मिळेल. तसेच, तुमच्या आरोग्यातही चांगली सुधारणा झालेली दिसेल.

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक भरभराटीचा असणार आहे. या कालावधीत तुम्हाला वडिलोत्पार्जित संपत्तीचा लाभ घेता येईल. कामकाजाच्या बाबतीत तुम्ही काही नवीन गोष्टी शिकाल. तसेच, अनेक नवीन आणि चांगले अनुभव तुम्हाला मिळतील. शेअर बाजारात देखील तुम्ही पैशांची गुंतवणूक करु शकता. तुमच्या वागण्यातून लोक प्रभावित होतील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Shani-Budh Yuti 2026 : 11 एप्रिलला शनि-बुधाचं होणार 'महामिलन'; पुढचे 20 दिवस 4 राशी राहतील टेन्शन फ्री, उत्पन्नात दुप्पट वाढ

Author : एबीपी माझा वेब टीम

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha