Dailyhunt
Eknath Shinde : बच्चू कडू दिव्यांग, शेतकरी, गोर-गरीबांचा नेता, उमेदवारीसाठी नव्हे तर सर्व घटकांना न्याय देण्यासाठी हाती भगवा; पक्ष प्रवेशानंतर एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

Eknath Shinde : बच्चू कडू दिव्यांग, शेतकरी, गोर-गरीबांचा नेता, उमेदवारीसाठी नव्हे तर सर्व घटकांना न्याय देण्यासाठी हाती भगवा; पक्ष प्रवेशानंतर एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

ABP माझा 1 week ago

Eknath Shinde on Bacchu Kadu Joins Shivsena : बच्चू कडू (Bacchu Kadu) एक कडवट कार्यकर्ता असून ⁠सर्वसामान्यांचाते नेतेआहे. दिव्यांग, शेतकरी, गरीब शोषितांचा नेता ही त्यांची ओळख आहे . ⁠त्यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह आज शिवसेनेत प्रवेश केला य . ⁠⁠लोकांसाठी झटणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे.

मीत्यांचं ⁠शिवसेनेत स्वागत करतो ⁠तशी शिवसेना त्यांना नवीन नाही. ⁠आज ते स्वगृही म्हणजेच शिवसेनेत आलेआहे. ⁠फक्त आमदारकीसाठी नाही तर गोरगरीबांच्या प्रश्नासाठी सत्तेतंल बळ लागते. ⁠अडीच वर्षांच्या काळात ते सोबत राहिलेत. ⁠त्यामुळे तुम्हाला आम्ही नवीन नाही, आम्हाला तुम्ही नवीन नाही. अशी प्रतिक्रियादेतउपमुख्यमंत्रीएकनाथशिंदे (Eknath Shinde) यांनी बच्चू कडूंच्यापक्षप्रवेशावरभाष्यकेलंय. (Bacchu Kadu Joins Shivsena)

विचारांच्या लढाईला ताकद द्यायची, दिघे साहेबांनी हेच शिकवले आहे. अन्यायाविरोधात लढा, ⁠आपल्या दोघांच्या भूमिका एकच आहे. ⁠मग सर्वसामान्यांचे कामे मागे राहणार नाही. ⁠राजकिय लढाई, शिवसेना वाढवण्याचं काम बच्चू कडू करतीलअसाविश्वासआहे. ⁠त्यांचं बरोबर प्रहार संघटनेचही बळ मिळेल असेही, एकनाथशिंदे (Eknath Shinde) म्हणाले.

Eknath Shinde उमेदवारीसाठीनव्हेतर सर्व घटकांना न्याय मिळवण्यासाठी त्यांनी प्रवेश केलाय

⁠बच्चू कडू बाळासाहेब यांच्या नेतृत्वात काम करणारे शिवसैनिक आहे. ⁠25 वर्ष गरीबांसाठी, प्रहार संघटनेसाठी ते काम करत आहे. ⁠मी त्यांना नेता, नाही कार्यकर्ता म्हणेन. ⁠कार्यकर्त्यांच्या भूमिकेतून बच्चू भाऊ निवडून आले. ⁠कर्जमाफीसाठी मोठं आंदोलन त्यांनी उभे केले. ⁠आम्ही तिघांनी कमिटी नेमून निर्णय घेतला. ⁠दिव्यागांसाठीत्यांनी अनेक आंदोलनं केली. ⁠सर्व घटकांसाठी लढणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. ⁠ही शिवसेना नवीन नाही, विचार एकच आहे. ⁠विधान परिषदेच्या उमेदवारीसाठीत्यांनी प्रवेश केला नाही. ⁠तर सर्व घटकांना न्याय मिळवण्यासाठी त्यांनी प्रवेश केलाय. असेहीएकनाथशिंदेम्हणाले.

Eknath Shinde: ⁠बच्चू कडू यांच्याप्रवेशानेशिवसेनाअधिकमजबूतहोईल

⁠बच्चू कडू यांच्या मागणीनुसार आम्ही दिव्यांग मंत्रालय मी मुख्यमंत्री असताना केलं. ⁠शिवसेना त्यांच्या येण्याने अधिक मजबूत होईल. ⁠प्रहार संघटना सामाजिक काम करत राहिल. ⁠शिवसेनेचा भगवा आणि धनुष्यबाण खांद्यावर घेतलाय. ⁠आम्ही सर्व सामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचं काम केलं असेहीएकनाथशिंदे (Eknath Shinde) म्हणाले.

इतरमहत्वाच्याबातम्या

Author : सुरज सावंत

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha