Foreignchi Patlin: मराठी मनोरंजनसृष्टीत असे अनेक चित्रपट आहेत जे आजही आवडीने पाहिले जातात. 2008 मध्ये प्रदर्शित झालेला 'फॉरेनची पाटलीण' (Foreignchi Patlin) या भन्नाट मराठी चित्रपटाला तब्बल 18 वर्षांनंतरही तेवढीच क्रेझ आहे.
या चित्रपटात तांदूळवाडी नावाच्या एका छोट्याशा मागासलेल्या खेड्यातील सरपंचाचा फॉरेनला शिकायला गेलेला मुलगा गावी येतो तो आपल्या बायकोला घेऊनच. जेनिफर नावाची ही तरुणी महाराष्ट्राच्या या सरपंचाच्या मुलाच्या रामच्या प्रेमात पडते आणि लग्न करून त्याच्या गावी येते. गावी आल्यावर जेनिफरची जानकी पाटील होते. पण इंग्रजी सुनेला स्विकारताना मराठी सासूची होणारी चिडचिड, त्रागा आणि कसरत पाहणं प्रचंड मनोरंजक आहे.
अठरा वर्षांपूर्वी येऊन गेलेला फॉरेनची पाटलीन हा सिनेमा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला होता. लोक आजही हा चित्रपट तेवढ्याच आवडीने पाहतात. या चित्रपटातील सर्वच पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. पण या चित्रपटातली 'फॉरेनची पाटलीन ' म्हणजेच जेनिफर उर्फ जेनीच्या चित्रपटातील अभिनयाचं सगळीकडे कौतुक झालं. भारतीय नसूनही चित्रपटात तिने उत्तम मराठी बोलत महाराष्ट्रीयन राहणीमान आणि वागण्या बोलण्याच्या पद्धती शिकून घेतल्याचं दिसतं. पण तुम्हाला माहिती ही जेनी नेमकी कोण आहे ? आणि ती काय करते ?
फॉरेनची पाटलीण चित्रपटातील अभिनेत्री नेमकी कोण?
जेनिफर हे पात्र साकारणाऱ्या या अभिनेत्रीचं खरं नाव बिलियाना रॅडोणीक असं आहे. मूळची युरोपमधील क्रोएटियामधील या तरुणीने इंटरनॅशनल अफेयर्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं. बिलियानाचं बालपण काहीसं खडतर होतं. युरोपमधील तणावाने तिला आणि तिच्या कुटुंबीयांना चरबी यामध्ये जाऊन निर्वासित म्हणून राहावं लागलं. पण त्यातूनही धीर न सोडता तिने तिचं शिक्षण पूर्ण केलं. आयुष्यातील काही घटनांमुळे ती अध्यात्माकडे वळली. नंतर योगा शिकून योगा इन्स्ट्रक्टर बनली. 2007 ते 2008 दरम्यान की अभिनेत्री भारतात तिच्या प्रोजेक्टच्या एका अभ्यासासाठी आली होती. त्यावेळी फॉरेनची पाटलीन चित्रपटाचीच तयारी सुरू होती. त्यावेळी दिग्दर्शक प्रदीप यांनी परदेशी मुलीचा रोल करण्यासाठी बलियानाची निवड केली. बिलियाना मुळात अभिनय क्षेत्रातले नव्हती ,पण हौस म्हणून तिने ऑडिशन दिली आणि तिची निवड झाली.

योग गुरूशी ओळख, लग्न
भारतात योग शिकत असताना तिची ओळख मोहनजी या गुरूंसोबत झाली. दोघांचेही विचार सारखे होते. त्यांनी पुढे जाऊन लग्न केलं. त्यांना एक मुलगीही आहे. तिचं नाव नीला आहे. खरंतर दुबईमधील एका योगा इव्हेंटमध्ये त्यांची ओळख झाली होती. त्यानंतर काही काळ एकमेकांशी ओळख वाढल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. बिलियानाने आपलं नाव बदलून देवी ठेवलं आहे. आता ती देवी मोहन या नावाने ओळखली जाते. मोहनजी आणि बिलियानाने एकत्र मोहनजी फाउंडेशन नावाची संस्था उघडली आहे. या संस्थेत इलियाना आंतरराष्ट्रीय ॲक्ट फाउंडेशनच्या अध्यक्ष आणि हिमालयान योगा फाउंडेशनच्या संचालक व वरिष्ठ प्राध्यापक म्हणून काम करते.

यामध्ये ती आत्मस्विकार, सत्य ,शुद्धता, करुणा, अहिंसा अशा मूल्यांची जाणीव करून देणार काम करते. फॉरेनची पाटलीन चित्रपटात काम केलेली अभिनेत्री बिलियाना आता पूर्णपणे अध्यात्माकडे वळली आहे. तिने तिच्या नवऱ्यासोबत अलीकडेच महाकुंभलाही हजेरी लावली होती. एवढंच नाही तर ती सोशल मीडियावरही ऍक्टिव्ह असते. अध्यात्म, योगा याविषयीच्या अनेक पोस्ट ती सोशल मीडियावर करत असते. पण, आजही बिलियानाला सगळे 'फॉरेनची पाटलीन' या चित्रपटामुळेच ओळखतात.
Author : abp majha web team

