Maharashtrachi Hasyajatra Actor Gurav More Wedding: महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोमधून घराघरात लोकप्रिय झालेला फिल्टर 'पाड्याचा बच्चन' गौरव मोरे ( Gaurav More) याने चाहत्यांना मोठं सरप्राईज दिलं आहे.
गौरव मोरेने खऱ्या आयुष्यात लग्न केलं असून अचानक समोर आलेल्या लग्नाच्या फोटोंनी चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. हास्यजत्रेत गौरवच्या स्टाईलचं कायम कौतूक होतं. त्यातच्या वेगळ्या अंदाजामुळे तो प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात राहतो. आता कुठलाही गाजावाजा न करता आपल्या गर्लफ्रेंडसोबत लग्न केलं असून अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने शेअर केलेल्या फोटोमुळे गौरवने लग्नगाठ बांधल्याचं समोर आले आहे. 'Mr & Mrs मोरे ' असं कॅप्शनही तिने या फोटोवर टाकलंय. त्यामुळे गौरवने लग्न केल्याचे कन्फर्म झालंय. गौरवने अत्यंत साध्या पद्धतीने आणि कोणालाही थांगपत्ता लागू न देता लग्न केल्याने त्याच्या चाहत्यांना चांगलंच सरप्राईज दिलंय.
गौरव मोरेनं केलं 'या' अभिनेत्रीशी लग्न
'फिल्टर पाड्याचा बच्चन ' गौरव मोरे हास्यजत्रेत कित्येकदा मुलीचा हात मागायला जातो, अन् रिजेक्ट होऊन परत येतो. पण, खऱ्या आयुष्यात गौरवने त्याची गर्लफ्रेंड प्रियंका कारेकर हिच्यासोबत लग्न करत चाहत्यांना सुखद धक्का दिलाय. विशेष म्हणजे गौरवने स्वतः अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत पोस्ट शेअर केलेली नाही. मात्र, त्याची जवळची मैत्रीण व मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीचे अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने शेअर केलेल्या एका फोटोमुळे हा गौप्यस्फोट झाला आहे.

या फोटोमध्ये गौरवची बायको साडी हातात चुडा, गळ्यात मंगळसूत्र अशा वेषात दिसतेय. गौरव तिच्या बाजूला उभारलाय. ऋतुजाने या दोघांसोबत फोटो काढत तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, "मिस्टर अँड मिसेस मोरे, तुमच्या या नवीन प्रवासासाठी आणि सुंदर नवीन घरासाठी तुमचे खूप खूप अभिनंदन! 'करू' आणि 'बच्ची', गॉड ब्लेस यू." गौरवने फक्त लग्नच नाही, तर आपल्या हक्काच्या नव्या घरात गृहप्रवेशही केलाय. एकाच वेळी दोन मोठे सरप्राईज मिळाल्याने गौरववर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, गौरव मोरेची पत्नी प्रियंकाही मनोरंजन विश्वातीलच असल्याचं तिच्या सोशल मीडियावरून कळतंय. तिने काही नाटक आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. इतकच नाही तर अभिनेत्री ऋतुजा बागवे आणि प्रियंका या खूप जुन्या आणि घट्ट मैत्रिणी आहेत.
Author : जयदीप मेढे

