Dailyhunt
Gaurav More Wife: गौरव मोरेची बायको आहे तरी कोण? थेट साऊथ सुपरस्टारसोबत स्क्रीन शेअर, बॉलिवूड दिग्दर्शकासोबतही केलंय काम

Gaurav More Wife: गौरव मोरेची बायको आहे तरी कोण? थेट साऊथ सुपरस्टारसोबत स्क्रीन शेअर, बॉलिवूड दिग्दर्शकासोबतही केलंय काम

ABP माझा 1 week ago

Who Is Priyanka Karekar Wife Of Gaurav More:महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमातून अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळाली. विशेषत: अभिनेता गौरव मोरेच्या (Gaurav More) स्टाइलला प्रेक्षकांकडून कौतुक करण्यात आलं.

'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणत अभिनेत्यानं प्रेक्षकांना खदखदून हसवलं. दरम्यान, गौरव मोरेनं गुपचूप नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. अखेर तो लग्नबंधनात (Gaurav More Wedding) अडकला आहे. गौरवनं लग्न केलं असून, त्याच्या लग्नाची बातमी समोर आल्यानं अनेकांना सुखद धक्का बसला. गौरवने नेमकं कुणासोबत लग्न केलं? गौरवची पत्नी आहे तरी कोण? असे असंख्य प्रश्न सध्या नेटकऱ्यांकडून उपस्थित केले जात आहे. दरम्यान, गौरव मोरेचं लग्न झाल्यापासून त्याच्यावर चाहते तसेच सिनेसृष्टीतील कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र, अद्याप गौरव मोरेनं कोणतीही अधिकृत पोस्ट सोशल मीडियात शेअर केलेली नाही. चला तर मग गौरव मोरेची अर्धांगिनी आहे तरी कोण, जाणून घेऊयात.

गौरवची पत्नी प्रियांका कारेकर आहे तरी कोण? (Gaurav More Wife Priyanka Karekar)

मिळालेल्या माहितीनुसार, गौरव मोरेनं त्याच्या प्रेयसीशी लग्न केलं असल्याची माहिती आहे. गौरवची अत्यंत जवळची मैत्रिण ऋतुजा बागवे हिनं आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये ऋतुजासोबत गौरव मोरे आणि त्याची पत्नी दिसत आहे. या पोस्टला तिनं, 'मिस्टर अँड मिसेस मोरे' असं कॅप्शन दिलं आहे. या पोस्टमधून गौरवनं लग्न केलं असल्याचं उघड झालं. गौरव मोरेच्या पत्नीच्या हातावर मेहंदी आहे. तसेच तिच्या हातात हिरवा चुडा देखील दिसत आहे. तिनं सोनेरी रंगाची सुंदर साडी नेसली असून, गळ्यात मंगळसूत्रही दिसत आहे. गौरव मोरेची पत्नी या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

प्रियांका कारेकर असं गौरव मोरेच्या पत्नीचं नाव आहे. ती केवळ गौरवची पत्नी नसून, सिने इंडस्ट्रीतील एक ओळखीचा चेहरा देखील आहे. माहितीनुसार, गौरव मोरेची पत्नी उत्तम अभिनेत्री असून, तिनं अनेक प्रोजेक्टसाठी काम केलं आहे. तिनं आपल्या कारकि‍र्दीत साऊथ इंडस्ट्रीतही काम केलं असल्याची माहिती आहे. तिनं साऊथ इंडस्ट्रीतील कलाकार दुलकर सलमानसोबत एका सिनेमासाठी स्क्रीन शेअर केली असल्याची माहिती आहे. तिनं आपल्या पोस्टमधून साऊथ इंडस्ट्रीतील बड्या कलाकारासोबत स्क्रीन शेअर करतानाचा अनुभव शेअर केला आहे.

प्रियांकाने आपल्या कारकि‍र्दीत हिंदी सिनेसृष्टीतही काम केलं आहे. तिनं आर. बाल्की दिग्दर्शित चूप: रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली होती. या सिनेमात बॉलिवूडचे दिग्गज कलाकारांनी काम केलंय. तसेच तिनं गौरी शिंदे यांसारख्या बॉलिवूड दिग्दर्शकांसोबतही काम केलं.

गौरवच्या आयुष्यात दुहेरी आनंद

गौरवनं गुपचूप लग्न तर केलं, पण त्याच्या आयुष्यातील आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. त्यानं आपल्या हक्काचं घर घेतलं आहे. मराठी सिनेसृष्टीतील कलाकार, कुटुंब तसेच मित्रपरिवारांनी त्याच्या घराला भेट देत शुभेच्छा दिल्या. त्यानं आपल्या दारावर 'फिल्टरपाड्याचा बच्चन' ही नेमप्लेट लावली आहे. सध्या त्याच्या घराच्या गृहप्रवेशाचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल होत आहे. गौरवच्या आयुष्यातील दुहेरी आनंद पाहून त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.

इतर बातम्या:

छोटा ब्रेक घेतोय, पुन्हा...' प्रसिद्ध अभिनेत्यानं सोशल मीडियातून घेतला ब्रेक, चाहते नाराज, कारण काय?

Author : एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha