Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
घटस्फोटीत क्रिकेटर सतत मेसेज करायचा; नकार दिल्यावरही थांबत नव्हता..; तारक मेहता'फेम अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली..

घटस्फोटीत क्रिकेटर सतत मेसेज करायचा; नकार दिल्यावरही थांबत नव्हता..; तारक मेहता'फेम अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली..

ABP माझा 6 days ago

 टीव्ही, ओटीटी विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री नेहल वडोलिया कायम तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते.
 'तारक मेहता का उलटा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतही तिने काम केले आहे. अभिनेत्री असलेली नेहल वडोलिया इंटिमसी कोऑर्डिनेटर म्हणून काम करते.

 अलीकडेच तिने एका मुलाखतीत राजस्थान रॉयल्सचा एक घटस्फोटीत क्रिकेटपटू वारंवार मेसेज करत असल्याचं सांगितलं. तिने कोणाचेही नाव घेतले नाही.

तिच्या फोटोखाली तो 'हॉट, ब्यूटीफूल, प्रीटी वगैरे मेसेज तो करतो. स्टेटस पाहून वारंवार मेसेज करतो. मी अजूनही त्याचा मेसेज दाखवू शकते ', असं अभिनेत्री म्हणाली.

जर मी त्याला मेसेज केला तर तो परत मला मेसेज करणं सुरू करेल.

मी त्याला म्हटलं की, तू मेसेज का करत आहेस, मला तुझ्याशी बोलायचं नाही. ' त्यानंतर थोडे दिवस त्याने मेसेज करणं बंद केलं.

'थोड्या दिवसांनी स्टेटस पाहून तो परत मेसेज करायला लागला. आता मी त्याला ब्लॉक केलं आहे. ' असं ती म्हणाली.सुनो इंडिया पॉडकास्टमध्ये तिने हा खुलासा केला.

चाहत्यांकडूनही अनेकदा तिला अशा प्रकारचे मेसेज येतात पण त्याकडे ती लक्ष देत नाही.

घराबाहेर असताना ती कायम मास्क घालते. एकदा किराणा सामान घेण्यासाठी ती बाहेर गेली असताना एका व्यक्तीने तिचा पाठलाग केल्याचंही तिने सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha