देशात सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. देशातील विविध शहारांमध्ये सोन्याच्या दरात घसरण दिसून आली. नवी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा दर 158430 रुपये प्रति तोळा झाला आहे. मुंबईत एक तोळे सोन्याचा दर 158280 रुपये इतका आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यातील वाद पुन्हा भडकण्याची चिन्ह निर्माण झाल्यानं, अमेरिकेनं इराणवर हल्ले सुरु केल्या डॉलर मजबूत झाल्यानं गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोने आणि चांदी ऐवजी डॉलरमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिलं आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष लवकर मिटण्याची चिन्ह नसल्यानं क्रूड ऑईलचे दर वाढण्याची शक्यता आणि जागतिक व्यापारावरील संकटामुळं चिंता वाढली आहे. यामुळं महागाई वाढू शकते. याशिवाय अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून पतधोरणात बदल न करण्याचा विचार दिसत असल्यानं सोने आणि चांदीसाठी तो नकारात्मक संकेत मानला जातोय. आंतरराष्ट्रीय बाजारात हाजिर सोन्याचा दर 4461.02 डॉलर प्रति औंस आहे.
मुंबई आणि कोलकाता येथे 22 कॅरेट सोन्याचा दर 145090 रुपये इतका आहे.तर, 24 कॅरेट सोन्याचा दर 158280 इतका आहे. नवी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा दर 158430 रुपये तोळा आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 145240 रुपये इतका आहे.चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 159810 इतका दर आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 147290 रुपये इतका आहे. तर, पुणे आणि बंगळुरुमध्ये देखील 24 कॅरेट सोन्याचा दर 158280 रुपये असून 22 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 145090 इतका आहे.
सोन्याच्या दरातील घसरणीप्रमाणं चांदीच्या दरात देखील घसरण झाली आहे. आज, चांदीचा दर 284900 रुपये किलो इतका आहे. जानेवारीत चांदीच्या दरानं 4 लाखांचा टप्पा पार केला होता. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा दर 74.96 डॉलर प्रति औंस इतका आहे.

