Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Gold Rate : सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, सोनं 1733 रुपयांनी तर चांदी 5659 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर

Gold Rate : सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, सोनं 1733 रुपयांनी तर चांदी 5659 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर

ABP माझा 1 week ago

 सोने आणि चांदीच्या दरात 8 जुलै रोजी मोठी घसरण झाली आहे. देश विदेशात क्रूड ऑईलच्या दरातील वाढ, डॉलर मजबूत होणे या कारणांमुळं सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे.
 आंतरराष्ट्रीय स्पॉट गोल्डचा दर 1.1 टक्क्यांनी घसरुन 4061.32 डॉलर प्रति औंसवर आले आहेत.

तर, यूएस गोल्ड फ्यूचर्सचा दर 2 टक्क्यांनी घसरला आहे. भारतात गोल्ड फ्यूचर्स आणि सिल्वर फ्यूचर्समध्ये देखील घसरण झाली आहे.

गोल्ड फ्यूचर्स 1.16 टक्क्यांनी घसरुन म्हणजे 1692 रुपयांनी घसरुन 143710 रुपये प्रति तोळा झाले आहेत. सिल्वर फ्यूचर्स 2.93 टक्क्यांनी घसरुन 224201 रुपयांवर आला आहे. आखाती देशांमधील वाढत्या तणावामुळे क्रूड ऑईलच्या दरात वाढ झाली आहे. यामुळं महागाई वाढण्याची शक्यता आहे, असं देखील सांगण्यात आलं आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे दर 6 टक्क्यांनी वाढले आहेत, यामुळं महागाई वाढण्याचं संकट आहे. दुसरीकडे महागाई नियंत्रित करण्यासाठी अमेरिकेच्या फेड रिझर्व्हकडून व्याज दरात वाढ केली जाण्याची शक्यता निर्माण झाल्यानं सोन्याच्या दरावंर परिणाम झाला.

गेल्या तीन दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण सुरु आहे. 3 जुलै रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 146344 रुपयांवर होता. त्यानंतर सोने दरात घसरण झाली आहे. काल सोन्याचा दर 144083 रुपयांवर होते. आज एक तोळे सोन्याचा दर 142350 रुपयांवर आला आहे. म्हणजेच सोन्याच्या दरात 1733 रुपयांची घसरण झाली.

22 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 131980 रुपयांवरुन कमी होऊन 130393 रुपयांवर आला आहे.म्हणजेच सोन्याचे दर 1587 रुपयांनी कमी झाले आहेत. चांदीचा एक किलोचा कालचा दर 227200 रुपये होता, त्यामध्ये आज 5650 रुपयांची घसरण झाली असून दर 221550 रुपयांवर आला आहे. हे दर आयबीजेएकडून जारी करण्यात आलेले असून जीएसटी शिवायचे आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha