Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Gold Rate Weekly Update : सोनं पाच दिवसात 6471 रुपयांनी महागलं, चांदी 17 हजार रुपयांनी महागली, अडीच लाखांच्या दिशेने वाटचाल

Gold Rate Weekly Update : सोनं पाच दिवसात 6471 रुपयांनी महागलं, चांदी 17 हजार रुपयांनी महागली, अडीच लाखांच्या दिशेने वाटचाल

ABP माझा 1 week ago

Gold Rate Weekly Update नवी दिल्ली : गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून अनेक जण सोन्यातील गुंतवणुकीला प्राधान्य देतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीमुळं गुंतवणूकदारांमध्ये चितेंचं वातावरण निर्माण झालं होतं.

तर, सोने आणि चांदीच्या दरात घसरण होत असल्यानं दागिने खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळत होता. मात्र, जून महिन्याच्या शेवटी आणि जुलै महिन्याच्या पहिल्या तीन दिवसात सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे.

सोने चांदीच्या दरात मोठी वाढ?

इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून दिवसातून दोन वेळा सोने आणि चांदीचे दर जाहीर केले जातात. या दरांनुसार सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या शुक्रवारी 26 जूनला मोहरमची सुट्टी असल्यानं त्यादिवशी सोने आणि चांदीचे दर जाहीर करण्यात आले नव्हते. त्यामुळं 25 जून च्या दरांचा आधार घेत 3 जुलैच्या सोने आणि चांदीच्या दरांची तुलना केल्यास सोने आणि चांदीचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या एका तोळ्याच्या दरात 6471 रुपयांची वाढ झाली आहे. तर, एक किलो चांदीचा दर देखील 17 हजारांनी वाढला आहे.

24 कॅरेट सोन्याच्या 29 जून ते 3 जुलै या कालावधीत मोठी वाढ झाली आहे. 25 जूनला 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 139461 रुपयांवर होता. तर, 3 जुलै रोजी एक तोळे सोन्याचा दर 146344 रुपयांवर पोहोचला आहे.

सोन्याचे दागिने बनवण्यासाठी ज्या 22 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो ते देखील महागलं आहे. 25 जूनला एक तोळे सोन्याचा दर 128260 रुपयांवर होता. 3 जुलै रोजी 22 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 133834 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच 22 तोळे सोने 5574 रुपयांनी महागलं आहे.

सोने दरातील वाढीप्रमाणं चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. 25 जूनला एक किलो चांदीचा दर 216541 रुपयांवर होता. तर, 3 जुलै रोजी एक किलोचा चांदीचा दर 233858 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच चांदीच्या दरात 17317 रुपयांची वाढ झाली आहे.

मे महिन्यानंत प्रथमच एका आठवड्यात सोने दरात तेजी आली आहे. यामुळं गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर 4200 डॉलर प्रति औंस झाला आहे. अमेरिकेमधील रोजगाराची आकडेवारी अपेक्षेपेक्षा कमजोर राहण्याची शक्यता आहे. यामुळंच फेड रिझर्व्हकडून व्याज दरात वाढ केली जाण्याची शक्यता कमी झाली आहे. दुसरीकडे डॉलर कमजोर झाल्यानं सोन्यातील गुंतवणूक वाढली आहे. दिग्गज अमेरिकन बँक जेपी मॉर्गननं सोन्याचा दर 4500 डॉलर प्रति औंसवर जाण्याचा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय केंद्रीय बँकांकडून 2027 पर्यंत सोने खरेदी सुरु ठेवली जाऊ शकते, असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. तर, चांदीचे दर देखील 65 डॉलर प्रति औंसच्या पुढे जाऊ शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Author : युवराज जाधव

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha