Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Gold Silevr Rate: सोन्याच्या दरात घसरण; तर चांदीचा वाढला 'भाव', सणासुदीच्या तोंडावर खरेदीची संधी, जाणून घ्या आजचे दर

Gold Silevr Rate: सोन्याच्या दरात घसरण; तर चांदीचा वाढला 'भाव', सणासुदीच्या तोंडावर खरेदीची संधी, जाणून घ्या आजचे दर

ABP माझा 1 week ago

Gold Silevr Rate: जागतिक पातळीवर वधारलेला डॉलर इंडेक्स आणि अमेरिका इराण मध्ये पुन्हा भडकलेले युद्ध याचा एकत्रित परिणाम सोने चांदीच्या दर घसरणीवर झाला असल्याचं चित्र दिसून येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या (Gold Silevr Rate) दरात घसरण झाल्याचं दिसून येत आहे, तर सध्या सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत असली तरी पुढील काळात भारतात असलेले सणवार पाहता, सोने चांदी दरात (Gold Silevr Rate) वाढ होण्याची शक्यता असल्याने आजचे घसरलेले सोन्याचे दर हे ग्राहकांसाठी खरेदीसाठी संधी आहे. आज (बुधवारी, ता 2) सोने स्वस्त झाले आहे तर चांदीचे दर वाढले आहेत.(Gold Silevr Rate)

Gold Silevr Rate: आज किती स्वस्त झाले सोने?

आज सोन्याच्या किंमतीत 208 रुपयांची घसरण झाली आहे. याचसोबत आज सोने 62,507 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव 208 रुपये म्हणजेच 0.13 टक्क्यांच्या घसरणीसह 1,54,252 रुपये प्रति 10 ग्रॅम राहिला आहे. यामध्ये 2,452 लॉटचा व्यवहार झाला आहे. बाजार विश्लेषकांनी सांगितले की कमकुवत स्पॉट मागणीमुळे सोने वायदा किंमतींमध्ये घसरण झाली आहे. जागतिक स्तरावर सोने 0.12 टक्क्यांच्या घसरणीसह 4,432.26 डॉलर प्रति औंस राहिले आहे.

Gold Silevr Rate: काल काय होता सोन्याचा रेट?

काल म्हणजेच 1 सप्टेंबर, मंगळवारी सोन्याच्या किंमतीत 2,045 रुपयांची घसरण झाली होती. याचसोबत काल गोल्ड 1,54,236 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या रेटवर विकले गेले आहे.

Gold Silevr Rate: आज काय आहे चांदीची किंमत?

आज चांदीची किंमत 0.19 टक्क्यांच्या तेजीसह 2,40,577 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये चांदीची किंमत 27 रुपये म्हणजेच 0.19 टक्क्यांच्या तेजीसह 2,40,577 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे. यामध्ये 2,655 लॉटचा व्यवहार झाला आहे. जागतिक स्तरावर चांदीच्या किंमतीत 0.17 टक्क्यांची घसरण झाली आहे आणि चांदी 66.46 डॉलर प्रति औंस राहिली आहे.

Gold Silevr Rate: काल चांदी किती स्वस्त झाली होती?

आज जरी चांदी महाग असली, तरी काल चांदी स्वस्त झाली होती. काल चांदीच्या किंमतीत 1,955 रुपयांची घसरण झाली आहे. चांदीने 1 सप्टेंबरच्या दिवशी 2,40,489 रुपये प्रति किलोग्रॅमवर व्यवहार केला आहे.

Gold Silevr Rate: एका आठवड्यात सोन्याच्या दरात 7000 तर चांदीच्या दरात 8000 रूपयांची घसरण

जागतिक पातळीवर वधारलेला डॉलर इंडेक्स आणि अमेरिका इराण मध्ये पुन्हा भडकलेले युद्ध याचा एकत्रित परिणाम सोने चांदीच्या दर घसरणी वर झाला असून, एकाच आठवड्यात सोन्याचे दर हे सात हजार रुपयांनी घसरण होत,162000 वरून आज 155000 वर खाली आले आहेत, तर चांदीच्या दरात ही आठ हजार रूपयांची घसरण होऊन, चांदीचे दर हे 247000 वरून 239000 वर खाली आल्याचं पाहायला मिळत आहे, सध्या सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत असली तरी पुढील काळात भारतात असलेले सन वार पाहता,सोने चांदी दरात वाढ होण्याची शक्यता असल्याने आजचे घसरलेले सोन्याचे दर हे ग्राहकांच्यासाठी खरेदीसाठी संधी असल्याची प्रतिक्रिया सुवर्ण व्यावसायिकांनी दिली आहे.

Author : जयदीप मेढे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha