Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Gold Silver Price: पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला देशवासीयांचा मोठा प्रतिसाद; 15 दिवसांत सोन्याची आयात 70% नी घटली; सराफ बाजारावर परिणाम, देशभरात आज सोन्या-चांदीचे दर काय?

Gold Silver Price: पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला देशवासीयांचा मोठा प्रतिसाद; 15 दिवसांत सोन्याची आयात 70% नी घटली; सराफ बाजारावर परिणाम, देशभरात आज सोन्या-चांदीचे दर काय?

ABP माझा 1 month ago

Gold Silver Price Today: मध्य आशियातील तणावामुळे देशात महागाई सातत्याने वाढत आहे. पेट्रोल, डिझेल, सीएनजीपासून ते दूध-साखरेपर्यंतचे दर वाढले असतानाच, आता सोने आणि चांदीच्या (Gold Rate Today) दरातही मोठी वाढ पाहायला मिळत आहे.

अशातचपंतप्रधान मोदींच्या आवाहनाला देशवासीयांनी मोठा प्रतिसाद दिल्याचेबघायलामिळतआहे. देशभर सोन्याची आयात आणि विक्रीत घट झाल्याचेचित्रआहे. २७ मे पर्यंतच्या 15 दिवसांत सोन्याची आयात तब्बल 70% ने घटली आहे. तर सोन्याची आयात 22 टनांवरुन 7.5 टनांपर्यंत घटली आहे. आयातशुल्क आणि मोदींच्या आवाहनामुळं सोने आयात, विक्रीत घट झालीअसून वर्षभर सोनं खरेदी करु नका असं पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतरहेचित्रबघायलामिळतआहे. तरदुसरीकडे सोन्या-चांदीच्यादारातही (Gold and Silver Rates) याचापरिणामबघायलामिळतआहे.

Gold Silver Price Today: सुवर्णनागरी जळगावमध्ये सोने चांदीच्यादरवाढीलाब्रेक!

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया कमकुवत झाल्यामुळे भारतात सोन्याची आयात महागली आहे, ज्यामुळे सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. आज, शनिवार, ३० मे रोजी, भारतात सोने आणि चांदीच्या दरात किंचित वाढ दिसून येत आहे. गुडरिटर्न्स वेबसाइटनुसार, सुरुवातीच्या व्यवहारात 24-कॅरेट सोन्याच्या दरात 10 रुपयांची वाढ होऊन तो 1,57,650 रुपयांवर पोहोचला आहे. त्याचप्रमाणे, चांदीच्या दरातही 100 रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीनंतर, एक किलो चांदीचा भाव आता 2,80,100 रुपये झाला आहे. तरसुवर्णनागरीजळगावमध्ये सोने चांदीच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही. काल (29 मे) असलेले सोने दर 155000 तर चांदी 264000 आजही कायम आहेत. यावरून असे दिसून येते की, भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा जोरदार सुधारणा होत आहे. अमेरिका-इराण युद्धाच्या अनिश्चिततेच्या आणि जागतिक महागाईच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने आणि चांदीची मागणी पुन्हा वाढली आहे.

Gold Silver Price Today: शहरानुसार आजचे सोन्याचे भाव

शहर24 कॅरेट (प्रति 10 ग्राम)22 कॅरेट (प्रति 10 ग्राम)18 कॅरेट (प्रति 10 ग्राम)
दिल्ली1,57,800 रुपये1,44,660 रुपये1,18,390 रुपये
मुंबई1,57,650 रुपये1,44,510 रुपये1,18,240 रुपये
कोलकाता1,57,650 रुपये1,44,510 रुपये1,18,240 रुपये
चेन्नई1,59,290 रुपये1,44,990 रुपये1,21,590 रुपये
बेंगलुरु1,57,650 रुपये1,44,510 रुपये1,18,240 रुपये

Silver Price Today: चांदीचा भाव

भारतात चांदीच्या दरातही आज प्रति किलो 5,000 रुपयांपर्यंत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे, त्याची किंमत आता ₹2,80,000 ते ₹2,85, 000 च्या दरम्यान आहे. किंबहुना, चेन्नईसारख्या दक्षिण भारतातील काही इतर राज्यांमध्ये चांदीची किंमत ₹2,90,000 प्रति किलोग्रामवर पोहोचली आहे.

Gold Silver Price : किमती पुन्हा का वाढल्या?

सराफा बाजार तज्ज्ञांच्या मते, अमेरिका आणि इराणमधील तणावामुळे जागतिक बाजारातील वातावरण निरुत्साही झाले आहे. शेअर बाजारातही सतत चढ-उतार होत आहेत. परिणामी, गुंतवणूकदार आपले भांडवल सुरक्षित ठेवण्यासाठी इक्विटीमधून पैसे काढून घेत आहेत आणि ते पुन्हा सोने-चांदीमध्ये गुंतवत आहेत, ज्यामुळे किमतींना मोठा आधार मिळाला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha