Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Gold Silver Price Today: गॅस, दूध महागले; पण सोने-चांदीने दिला दिलासा, एका दिवसात सोनं 2 हजारांनी स्वस्त, पाहा आजचे दर

Gold Silver Price Today: गॅस, दूध महागले; पण सोने-चांदीने दिला दिलासा, एका दिवसात सोनं 2 हजारांनी स्वस्त, पाहा आजचे दर

ABP माझा 4 days ago

Gold Silver Price Today: देशभरात नागरिकांना महागाईच्या (Inflation) झळा बसत आहेत. एकीकडे गॅस सिलेंडर (Gas Cylinder), दूध (Milk), एटीएफ आणि रिक्षा दरवाढीमुळे (Auto Fare) सर्वसामान्यांच्या खर्चात वाढ झाली आहे.

मात्र, दुसरीकडे सराफा बाजारातून ग्राहकांना दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज, 1 सप्टेंबर रोजी सोने (Gold) आणि चांदीच्या (Silver) किमतीत घसरण नोंदवण्यात आली आहे. सणासुदीचा काळ सुरू असताना सोन्याच्या आणि चांदीच्या दरात झालेल्या या घसरणीमुळे दागिने खरेदी करण्याची तयारी करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये आज दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात घसरण झाली आहे.

Gold Price Today: एका दिवसात सोनं 2,045 रुपयांनी स्वस्त

आज, 1 सप्टेंबर रोजी सोन्याच्या दरात तब्बल 2,045 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. त्यानंतर सोने प्रति 10 ग्रॅम 1 लाख 54 हजार 236 रुपये या दराने व्यवहार करत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये ऑक्टोबर महिन्यात पुरवठा होणाऱ्या सोन्याच्या कराराच्या दरात 2,045 रुपये म्हणजेच 1.31 टक्क्यांची घसरण झाली आहे. सोन्याच्या या करारामध्ये 2,680 लॉटचा व्यवहार झाला आहे. स्पॉट मार्केटमधील कमकुवत कलानुसार सोन्याच्या किमतीत घसरण झाल्याचे सांगितले जात आहे. जागतिक बाजारातही सोन्याचा दर 0.51 टक्क्यांनी घसरून 4,432.51 डॉलर प्रति औंस इतका राहिला आहे.

Gold Price Today: शहरानुसार सोन्याचे दर किती?

दिल्लीमध्ये (Delhi) सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 1 लाख 54 हजार 236 रुपये आहे. मुंबईत (Mumbai) आणि कोलकात्यात (Kolkata) सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1 लाख 54 हजार 36 रुपये आहे. चेन्नईमध्ये (Chennai) देखील सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1 लाख 54 हजार 36 रुपये इतका आहे. तर पटनामध्ये (Patna) सोने प्रति 10 ग्रॅम 1 लाख 54 हजार 136 रुपये दराने उपलब्ध आहे.

Silver Price Today: चांदीही 1,955 रुपयांनी स्वस्त

सोन्यासोबतच चांदीच्या किमतीतही आज मोठी घसरण झाली आहे. एमसीएक्सच्या आकडेवारीनुसार, चांदीच्या दरात 1,955 रुपयांची घट झाली असून, चांदीचा भाव आता प्रति किलो 2 लाख 40 हजार 489 रुपये इतका आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये चांदीच्या किमतीत 0.81 टक्क्यांची घसरण झाली आहे. या व्यवहारात 2,004 लॉटची नोंद झाली आहे. जागतिक बाजारातही चांदीच्या दरात घसरण झाली असून, चांदीचा भाव 1.04 टक्क्यांनी घसरून 68.22 डॉलर प्रति औंस इतका झाला आहे. एकीकडे विविध जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खर्चात वाढ होत असताना, सणासुदीच्या काळात सोने आणि चांदीच्या दरात झालेली ही घसरण ग्राहकांसाठी काही प्रमाणात दिलासादायक ठरू शकते.

Financial Changes From 1 September 2026: दूधपासून रिक्षा, टॅक्सी, CNG पर्यंत...; आजपासून काय महाग? पाहा 10 महत्वाचे बदल, A टू Z माहिती

Author : जयदीप मेढे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha