Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Gold Silver Rate : सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर

Gold Silver Rate : सोने दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 3 हजारांनी तर चांदी 5000 रुपयांनी महागली, जाणून घ्या लेटेस्ट दर

ABP माझा 1 week ago

 Gold Price Today :अमेरिकन डॉलर कमजोर झाल्यानं आणि जागतिक बाजार मजबूत झाल्यानं सोन्याच्या दरात वाढ झाली. तर, चांदीच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली. नवी दिल्लीत सोनं 3000 रुपयांनी महागलं.

राजधानीतील सोन्याचा दर 144500 रुपयांवरुन 147500 रुपयांवर पोहोचला आहे.

दुसरीकडे चांदीच्या दरात देखील तेजीचा ट्रेंड कायम आहे. सलग तिसऱ्या दिवशी चांदी महागली आहे. आज चांदीच्या दरात 5000 रुपयांची वाढ होऊन चांदी 240000 रुपये किलोवर पोहोचली.

सोने आणि चांदीच्या व्यावसायिकांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजार मजबूत झाल्यानं आणि अमेरिकन डॉलर कमजोर झाल्यानं सोन्याची मागणी वाढली आहे. याशिवाय ओद्योगिक वापर आणि गंतवणूक मोठ्या प्रमाणात राहिल्यानं चांदीच्या दरात वाढ कायम आहे.

इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून जारी करण्यात आलेल्या दरांनुसार 1 जुलै रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 141632 रुपयांवर होता. आज सायंकाळी सोन्याचा दर 143003 वर आहे.म्हणजेच सोन्याच्या दरात 1371 रुपयांची वाढ झाली.

आयबीजेएच्या दरानुसार 22 कॅरेट सोन्याचा 1 जुलै रोजीचा एका तोळ्याचा दर 129735 रुपयांवर होता. आज सायंकाळी सोन्याचा दर 130990 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच आज 22 कॅरेट सोनं 1255 रुपयांनी महागलं आहे. तर, एक किलो चांदीचा कालचा दर 225430 रुपये होता, तो आज 228850 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच 3420 रुपयांची वाढ झाली आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय वैश्विक बाजारात स्पॉट गोल्डच्या दरात 38.75 डॉलर्सची वाढ झाली आहे. स्पॉट गोल्डचा दर 4070.04 डॉलर प्रति औंस झाला आहे. स्पॉट सिल्वरचा दर 59.89 डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha