Dailyhunt
Gold Silver Rate Today: ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा, सोने-चांदीच्या दरात मोठे चढउतार, एक तोळा सोन्याचा भाव किती?

Gold Silver Rate Today: ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा, सोने-चांदीच्या दरात मोठे चढउतार, एक तोळा सोन्याचा भाव किती?

ABP माझा 1 week ago

Gold Silver Rates Today: गेल्या महिनाभरापेक्षा जास्त कालावधीपासून मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरातील व्यापारावर, इंधन, सोने चांदी, शेअर बाजारावर मोठा परिणाम होताना दिसतोय.( Iran Isreal USA War) गेल्या महिनाभरापासून सोन्या चांदीच्या दारात सातत्याने चढउतार होत आहेत.

अमेरिका, इराण आणि प्रादेशिक मध्यस्थांचा एक गट संभाव्य 45 दिवसांच्या युद्धविरामाच्या अटींवर चर्चा करत आहे. अवघ्या जगाचे लक्ष इराण इस्रायल अमेरिकेच्या युद्धाकडे लागले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला निर्वाणीचा इशारा दिलाय. इराण शरण नाही आला, तर इराणमधील संपूर्ण वीज आणि ब्रीजवर हल्ला करण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. युद्धबंदीसाठी अटी शर्ती थांबायला तयार नाहीत. पुढील 48 तासात कुठला करार होतो का याकडे सर्वांचे लक्ष असताना, आज पुन्हा एकदा सोन्या चांदीच्या किमतींमध्ये मोठे बदल होताना दिसयतात. (Gold Silver Rates Today)

आज सोन्या - चांदीचे भाव किती?

आज पुन्हा एकदा सोन्याचांदीच्या किमतींमध्ये मोठी घट झालेली दिसत आहे. IBJA च्या आजच्या किमतीनुसार, 24 कॅरेट सोन्यासाठी आज 1 लाख47 हजार 891 रु प्रति 10 ग्रॅम माजावे लागतील. तर 22 कॅरेट सोन्यासाठी ग्राहकांना 1 लाख 47 हजार 299 रुपये मोजावे लागतील. तर चांदी किलोमागे 2 लाख 31 हजार 028 रुपये झालीय.

गेल्या महिन्याभरापासून सोन्या चांदीच्या दरांवर युद्ध तणावाचा मोठा परिणाम होताना दिसतोय. साधारणतः युद्धजन्य परिस्थितीत सोने-चांदीच्या किंमतीत वाढ अपेक्षित असते, मात्र सध्या गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून अमेरिकन डॉलरकडे वळताना दिसत आहेत. दोन दिवसांपूर्वी शुक्रवारी ( 3 मार्च ) 24 कॅरेट सोन्याची किंमत 3020 रुपयांनी घसरली होती. 10 ग्रॅम सोन्यामागे ग्राहकांना एक लाख 49 हजार 470 रुपये द्यावे लागले. आता आज 10 ग्रॅम सोन्याची किंमत साधारणतः 2 हजारांनी पुन्हा घसरली असून ती 1 लाख 47 हजार 299 रुपये झालीय.

दरात घसरण का झाली?

जागतिक स्तरावर युद्धाचे सावट असतानाही गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर नफा वसुली (Profit Booking) केल्याने सोन्या-चांदीच्या किमतीवर दबाव निर्माण झाला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या मूल्यात झालेल्या बदलांचा परिणाम भारतीय बाजारपेठेवर झाला असून सोन्याच्या झळाळीत घट झाली आहे.

Author : abp majha web team

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha