Hindi Rajbhasha Sammelan 2026, Vashi : राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांचा रिक्षा-टॅक्सीचालकांच्या मराठीबाबतचा (Marathi Compulsory Auto Taxi Driver) निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी फिरवला.
देवेंद्र फडणवीसांनी मराठी शिकण्यासाठी रिक्षा टॅक्सीचालकांना एक वर्षांची मुदतवाढ दिली आहे. रिक्षा टॅक्सीचालकांच्या शिष्टमंडळाने नुकतीच देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. मराठी शिकण्यासाठी प्रयत्न करतोय, पण त्यासाठी वेळ मिळावा अशी मागणी त्यांनी केली. ती मागणी मान्य करून देवेंद्र फडणवीसांनी एक वर्षांची मुदतवाढ दिली. तरयानिर्णयाविरोधात मनसे कोर्टात जाणार असल्याची माहिती आहे. अमराठी चालकांना चुकीच्या पद्धतीने बॅच आणि परवाने दिल्याचा मनसे वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय यांचा आरोप आहे. एकंदरीतराज्यातमराठी-हिंदीभाषेवरूनवादआणिराजकारणतापलंअसताना गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी नवीमुंबईतील वाशीत हिंदी राजभाषा संमेलन (Hindi Rajbhasha Sammelan 2026) आयोजितकरण्यातयेणारआहे. 14 सप्टेंबरला वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रात सहावे अखिल भारतीय राजभाषा संमेलन आयोजितकरण्यातयेणारआहे. मुख्यम्हणजेयाकार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याप्रमुख उपस्थितीत या संमेलनाचे आयोजन करण्यातआल्याचीमाहितीआहे.
Vashi News : सिडको प्रदर्शन केंद्राचा परिसर कार्यक्रमासाठी राखीव, 10 हजारांहून अधिक वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था
दरम्यान, येत्या 14 आणि 15 सप्टेंबर असे दोन दिवस हे संमेलन होणार आहे. देशभरातील हिंदी भाषिक साहित्यिक, संस्था, अधिकारी आणि प्रतिनिधींची याकार्यक्रमाला उपस्थिती राहणारआहे. केंद्र व राज्य सरकारमधील वरिष्ठ मंत्री आणि अधिकारीही याकार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमासाठी सिडको प्रदर्शन केंद्राचा परिसर कार्यक्रमासाठी राखीव ठेवण्यातआलाअसून 10 हजारांहून अधिक वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्याचे नियोजन असल्याचीमाहितीआहे. गणेशोत्सव आणि गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्ताचे देखील नियोजन करण्यातयेणारआहे.
Hindi Rajbhasha Sammelan 2026: मुंबईच्या वेशीवर हिंदी राजभाषा संमेलन; नव्यावादालातोंडफुटण्याचीशक्यता
एकीकडे राज्यात सुरुअसलेल्या मराठी-अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर वाशीत हिंदी राजभाषा संमेलनामुळे राजकीय चर्चेला उधाण येण्याची शक्यता आहे. रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून राज्यात वातावरण तापलेले असतानाच केंद्राचा मोठा हिंदी कार्यक्रम मुंबईच्या वेशीवर होणारअसल्यानेनव्यावादालातोंडफुटण्याचीशक्यताआहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Author : अभिषेक मुठाळ

