Hindu Religion: देवाचे मंदिर...एक असे ठिकाण..ज्याला श्रद्धा, साधना आणि आत्मिक शांतीचे स्थान मानले जाते. मंदिरात जाण्यामागे केवळ देवदर्शन नसून मनाला शांत करणे, सकारात्मक विचार करणे आणि काही काळ सांसारिक चिंता बाजूला ठेवणे हा भाव असतो.
आपण अनेकदा पाहतो, मंदिरात प्रवेश केल्यानंतर काही लोक घंटा वाजवतातच, मात्र मंदिरातून बाहेर पडताना देखील अनेक लोक घंटा वाजवतात. मात्र असे करणे अनेकदा का टाळले जाते? यामागचे नेमके कारण काय? धार्मिक मान्यता, वास्तुशास्त्रातील उल्लेख जाणून घ्या...
मंदिरात घंटा वाजवण्याचे महत्त्व काय? (Hindu Religion)
हिंदू धर्मातील मंदिरांमध्ये घंटानादाला विशेष महत्त्व आहे. मंदिरात प्रवेश केल्यानंतर अनेक भाविक घंटा वाजवून देवाचे दर्शन घेतात. धार्मिक मान्यतेनुसार, मंदिरातील घंटानाद हा मन एकाग्र करण्यासाठी आणि पूजेच्या वातावरणात सकारात्मकता निर्माण करण्यासाठी केला जातो. घंटानादाने मनातील चंचल विचार दूर होऊन भक्ताचे लक्ष देवाकडे केंद्रित होते, अशी श्रद्धा आहे. मंदिरात प्रवेश करताना घंटा वाजवणे हे देवाच्या उपस्थितीची जाणीव करून घेण्याचे आणि भक्तीभाव जागृत करण्याचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे घंटानाद मुख्यतः मंदिरातील पूजा आणि देवदर्शनाशी जोडला जातो.
मंदिरातून बाहेर पडताना पुन्हा घंटा वाजवू नये?
दुसरीकडे, काही परंपरांनुसार मंदिरातून बाहेर पडताना पुन्हा घंटा वाजवणे टाळले जाते. कारण बाहेर पडताना मन देवाच्या स्मरणात ठेवणे आणि मंदिरातील धार्मिक वातावरणाचा आदर राखणे अधिक महत्त्वाचे मानले जाते. काही परंपरांमध्ये मंदिरातून बाहेर पडताना पुन्हा घंटा वाजवणे टाळतात. यामागे असा धार्मिक समज आहे की घंटानाद हा देवपूजेची सुरुवात आणि मनाची एकाग्रता यासाठी असतो; त्यामुळे बाहेर पडताना विनाकारण घंटानाद करण्याची आवश्यकता नाही..
वास्तुशास्त्र काय सांगते?
तुम्ही अनेकदा पाहिले असेल की, बरेच लोक मंदिरातून बाहेर पडताना घंटा वाजवतात. त्यांना पाहून इतर लोकही मंदिरातून बाहेर पडताना घंटा वाजवतात, जे चुकीचे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार, मंदिरातून बाहेर पडताना घंटा वाजवू नये, कारण असे केल्याने तुम्ही मंदिराची सकारात्मक ऊर्जा मागे सोडून जाता. म्हणूनच, मंदिरातून बाहेर पडताना घंटा वाजवू नये. वास्तुशास्त्राशी संबंधित काही मान्यतांमध्ये घंटानादाला सकारात्मक ऊर्जा आणि वातावरणातील स्पंदनांशी जोडले जाते. मात्र, मंदिरातून बाहेर पडताना घंटा वाजवू नये, हा नियम सर्व मंदिरांमध्ये किंवा सर्व हिंदू परंपरांमध्ये अनिवार्य आहे असे नाही. त्यामुळे मंदिरात घंटा वाजवताना तेथील प्रचलित नियम आणि परंपरेचे पालन करणे हेच योग्य मानले जाते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Author : एबीपी माझा वेब टीम

