Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Horoscope Today 5 July 2026: आजचा रविवार 6 राशींचं नशीब पालटणारा! ग्रहांचे शुभ योग जुळले, कोण भाग्यशाली? कोणासाठी टेन्शन? आजचे राशीभविष्य...

Horoscope Today 5 July 2026: आजचा रविवार 6 राशींचं नशीब पालटणारा! ग्रहांचे शुभ योग जुळले, कोण भाग्यशाली? कोणासाठी टेन्शन? आजचे राशीभविष्य...

ABP माझा 2 weeks ago

Horoscope Today 5 July 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 5 जुलै 2026, आजचा वार रविवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस हा शनिदेवांना समर्पित दिवस आहे. हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे.

कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. सूर्यदेवाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आज काही कारणांमुळे ताणतणावाला सामोरे जावे लागेल, वडिलोपार्जित इस्टेट मध्ये आपली फसवणूक होत नाही ना याची दक्षता घ्या

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस राजकारणी व्यक्तींना आपली बाजू जनतेसमोर मांडण्यासाठी काहीतरी नवीन नियुक्ती शोधावी लागेल

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे, रोगांना आमंत्रण द्याल, महिला परिस्थितीनुसार आचरण ठेवतील

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भावना इच्छा आणि कार्य यांचा खोल संघर्ष तुझ्या मनामध्ये सतत चालेल

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मनात एक आणि प्रत्यक्ष कृतीमध्ये एक अशी विसंगती आज आढळणार आहे

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्या जवळच्या लोकांच्या मनात तुमच्याबद्दल थोडी भीती उत्पन्न होईल, परंतु परिस्थिती आटोक्यात आणण्यात तुम्ही यशस्वी व्हाल

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काही गोष्टी तुमच्या मनासारख्या होतील, त्यामुळे जोडीदाराचे सहकार्य ही तुम्हाला उत्तम मिळेल

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसायामध्ये विचाराने कोणतेही धाडस करू नये, यंत्रावर काम करताना सांभाळून राहावे

धनु रास (Saggitarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कोणताही नवीन विचार लोकांपुढे मांडण्यात यशस्वी होण्याची शक्यता आहे

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतरांशी फटकून वागाल वेळच्या वेळी काम आणि आरामाच्या वेळी आराम हे सूत्र मात्र लक्षात ठेवा

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सरकारी कामांमध्ये अडथळे येऊ शकतात, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ताणतणावामुळे रक्तदाब वाढणार नाही याची काळजी घ्यावी, सत्ता स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सावध पवित्रा ठेवून प्रगती करावी लागेल.

Lord Shiv: शिवलिंगासमोर भाविक 3 टाळ्या का वाजवतात? काय आहे यामागील महत्त्व, शास्त्र अन् फायदे? जाणून व्हाल थक्क...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Author : ज्योतिषाचार्य डॉ. शिल्पा अग्निहोत्री

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha