Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Horoscope Today 8 October 2026: आजचा गुरूवार 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..

Horoscope Today 8 October 2026: आजचा गुरूवार 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..

ABP माझा 1 month ago

Horoscope Today 8 October 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 8 ऑक्टोबर 2026, आज गुरूवारचा दिवस अत्यंत खास आहे, सध्या पितृपक्ष पंधरवडा सुरू आहे. आजचा हा दिवस भगवान दत्तगुरूंना समर्पित आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. दत्तगुरू कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस भागीदारीत पार्टनरशी थोडे वाद संभवतात, घरी दारी समजूतीचे धोरण स्वीकारा

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस नोकरीच्या ठिकाणी कामानिमित्त परदेशात जाण्याच्या संधी येतील, प्रवासामध्ये तब्येतीची काळजी घ्या

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस चुकीचे निर्णय घेणे यासारख्या चुका होऊ शकतात, पण त्याचे भान ठेवले तर बरेच काही साधून जाईल

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस आर्थिक बाजू सुधारली तरी पैसा हातात टिकणार नाही, तुमची ग्रहण शक्ती मात्र उच्च प्रतीची राहील

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी आजचा दिवस तुम्ही केलेल्या एखाद्या नवनिर्मितीला म्हणावा तसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे मन थोडे नाराज होईल

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस इतरांना कटू बोलण्यात तुम्ही हार मानणार नाहीत, परंतु त्याचे परिणाम वाईट होऊ शकतात हे लक्षात ठेवा

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस खूप मनमोकळं स्वतःच्या मनाप्रमाणे वागायचा विचार असेल, परंतु तसे न करता आल्यामुळे थोडी चिडचिडच होईल

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस मोठ्यांच्या मनाप्रमाणे वागावं लागेल, यामुळे तुमची चांगलीच कुचंबणा होईल

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस कारण नसताना काळजी करण्याचा स्वभाव बनेल, आत्मविश्वास व उत्साहाचा भाग कमी राहील


मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी आजचा दिवस नोकरी व्यवसायात मंदी जाणवेल, मुलांच्यासाठी काही कारणाने पैसा खर्च करावा लागेल

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस महिलांना मनात नसताना काटकसर करावी लागेल, परंतु खर्चावर काटेकरपणे नियंत्रण ठेवण्यात यशस्वी व्हाल


मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस घरामध्ये काही व्यक्तींमुळे मानसिक त्रास होण्याचा संभव आहे, प्रकृती अस्वस्थ जाणवेल.

:

Hindu Religion: कुलदेवता, ग्रामदेवता की इष्टदेवता? पूजा आधी कोणाची करावी? पूजेचा योग्य क्रम कमी लोकांना माहित, धार्मिक मान्यता...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Author : एबीपी माझा वेब टीम

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha