Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ह्रदयद्रावक... मुंबईतील 60 पर्यटक नेपाळमधील 'त्या' इमारतीच्या ढिगाऱ्यात दबल्याची शंका;  नेपाळ सरकारनं काय म्हटलं?

ह्रदयद्रावक... मुंबईतील 60 पर्यटक नेपाळमधील 'त्या' इमारतीच्या ढिगाऱ्यात दबल्याची शंका; नेपाळ सरकारनं काय म्हटलं?

ABP माझा 2 weeks ago

मुंबई : नेपाळच्या कैलास मानसरोवर फिरण्यासाठी गेलेले मुंबईतील (Mumbai) 60 पर्यटकांचा चिखल, माती आणि ढिगाऱ्याखाली फसून मृत्यू झाला असल्याची शंका नेपाळ सरकारला आहे. अंधेरीतील डॉक्टर मिलिंद चितळे यांच्या हिल अँड ट्रॅकिंग कंपनीच्या माध्यमातून हे 60 पर्यटक नेपाळमध्ये (Nepal Flood) कैलास मानसरोवर फिरण्यासाठी गेले होते.

मात्र, सकाळी साडेआठ वाजता नेपाळ-चीन बॉर्डरवर असलेल्या कस्टम आणि इमिग्रेशन इमारतीजवळ ते सर्व पर्यटक पोहोचल्यावर ही महाप्रलयाची दुर्दैवी दुर्घटना घडली. यावेळी डोंगराचा मोठ्या प्रमाणात ढिगारा, चिखल आणि माती इमारतीवर पडल्यामुळे हे सर्व पर्यटक 40 ते 50 फूट खाली दबले गेल्याची शंका व्यक्त होत आहे.

नेपाळ सरकारकडून आता या पर्यटकांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे की, नेपाळ सरकार सध्या घटनास्थळी पोहोचू शकत नाही. नेपाळ-चीन सीमेजवळ घडलेल्या दुर्घटनेमुळे 90 किलोमीटर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल, माती आणि दगडांचा ढिगारा असल्यामुळे पर्यटकांना शोधण्यात मोठी अडचण होत आहे. त्या इमारतीजवळ फक्त हेलिकॉप्टरने सर्च ऑपरेशन करता येते. मात्र, तो एवढा मोठा ढिगारा असल्यामुळे त्याला साईडला करता येत नसल्याची मोठी अडचण नेपाळ सरकारसमोर निर्माण झाली आहे.

नेपाळ सरकारकडून या भारतीय पर्यटकांच्या कुटुंबियांना काही दिवस थांबण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. त्याअगोदर भारतामध्ये लोकल पोलीस स्टेशनमध्ये पर्यटक हरवल्याच्या तक्रारी नोंदवायच्या सूचना देखील नेपाळ सरकारकडून भारतीय दुतावासाला देण्यात आल्या आहेत. नेपाळ सरकारच्या सूचना ऐकल्यानंतर या पर्यटकांच्या कुटुंबासमोर मोठा दुःखाच्या डोंगर कोसळला आहे.

40 ते 50 फूट खाली दबले गेले असावेत

दरम्यान, ज्या ठिकाणी नेपाळ आणि चीन सीमेवर इमिग्रेशन आणि कस्टमच्या इमारती आहेत, त्यावर मोठ्या प्रमाणात डोंगराचा भाग आणि माती चिखल आल्यामुळे इमारत दबली गेली आहे, हे सर्व पर्यटक 40 ते 50 फूट खाली दबले गेले आहेत, अशी माहिती देण्यात येत आहे. येथील 90 किलोमीटर रस्ता चिखलामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी पोहोचण्यास अशक्यप्राय बाब आहे. मोठ्या प्रमाणात चिखल असल्यामुळे त्याला बाजूला काढणे शक्य होणार नसल्याचं नेपाळ सरकारचं मत आहे.

अडकलेल्या पर्यटकांसाठी शिवसेना मदत कक्ष

नेपाळ महापुराच्या पार्श्वभूमीवर शिवसेना मदत कक्ष सक्रिय झाला असून, शिवसेना सोशल मिडिया राज्यप्रमुख राहुल कनाल यांच्या नेतृत्वात काठमांडू येथे गेल्या 5 दिवसांपासून शिवसेना मदत कक्षाच्या माध्यमातून अविरतपणे मदतकार्य सुरू आहे. या मदत कक्षाच्या माध्यमातून नेपाळमध्ये अडकलेल्या 11 विद्यार्थ्यांना सुखरूपरित्या पुण्यात आणण्यात आले. तर कैलास मानसरोवर येथे गेलेल्या 37 भाविकांना देखील मुंबईत सुखरूप पोहोचविण्यात आले. तसेच नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील आणखी 140 भाविकांशी संपर्क झाला असून, लवकरच त्यांना मुंबईला रवाना करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

हेही वाचा

नेपाळ प्रलयात जो धडकी भरवणारा व्हिडिओ समोर आला त्याच चीनच्या इमिग्रेशन इमारतीमध्ये मुंबईचे डॉक्टर मिलिंद चितळेंसह 60 पर्यटक ट्रॅप; 'रिचा ट्रॅव्हल्स'ने दिली माहिती

Author : सत्यम सिंह

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha