Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
IND vs SL 2nd Test Match Draw : नवखी श्रीलंका नेटाने लढली, भारताचा विजयाचा घास हिरावला, सोनलच्या झुंझार शतकाने लंका चमकली!

IND vs SL 2nd Test Match Draw : नवखी श्रीलंका नेटाने लढली, भारताचा विजयाचा घास हिरावला, सोनलच्या झुंझार शतकाने लंका चमकली!

ABP माझा 1 week ago

India vs Sri Lanka 2nd Test Match Draw : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना अखेर अनिर्णित राखण्यात श्रीलंकेला यश आले आहे. पहिल्या डावात मिळालेल्या 213 धावांच्या आघाडीनंतर टीम इंडिया सहज विजय मिळवेल असे चित्र होते, मात्र श्रीलंकेचा युवा फलंदाज सोनल दिनुशा याने केलेल्या चिवट फलंदाजीमुळे टीम इंडियाच्या हाता तोंडाशी आलेला विजय निसटला.

जरी दुसरा कसोटी सामना श्रीलंकेने ड्रॉ करण्यात यश मिळवले असले आणि टीम इंडियाला या सामन्यात विजय मिळवता आला नसला, तरी मालिकेतील पहिल्या सामन्यातील विजयाच्या जोरावर भारताने ही मालिका 1-0 ने जिंकून ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. सोनल दिनुशाच्या या अप्रतिम खेळीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

भारताचा डाव 503 धावांवर घोषित; पडिक्कल अन् जुरेलचं शतक

टीम इंडियाने पहिल्या डावात 503 धावांवर डाव घोषित केला. भारताने 138 षटकांत 9 गडी गमावत ही धावसंख्या उभारली. त्यामुळे श्रीलंकेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. भारताकडून ध्रुव जुरेलने नाबाद 115 धावांची ऐतिहासिक खेळी केली. त्याने 177 चेंडूंचा सामना करत 9 चौकार आणि 2 षटकार लगावले. जुरेलच्या संयमी आणि आक्रमक फलंदाजीमुळे भारताला पाचशेचा टप्पा पार करता आला.

देवदत्त पडिक्कलनेही शानदार शतक झळकावत 117 धावा केल्या. 193 चेंडूंमध्ये त्याने 12 चौकारांच्या मदतीने ही खेळी साकारली. कर्णधार शुभमन गिलने 50 धावांची अर्धशतकी खेळी केली, तर ऋषभ पंतने 63 धावा करत महत्त्वाचे योगदान दिले. रविंद्र जडेजाने 43 धावा केल्या. श्रीलंकेकडून असिथा फर्नांडो सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 106 धावा देत 4 विकेट घेतल्या. प्रबाथ जयसूर्याने 2, तर केशरा नुवंथा याने 2 विकेट घेतल्या. लाहिरू कुमारा याला एक विकेट मिळाली.

श्रीलंकेचा डाव 290 धावांत संपुष्टात; सोनल दिनुशाची झुंजार शतकी खेळी

कोलंबो कसोटीत श्रीलंकेचा पहिला डाव 290 धावांवर आटोपला. श्रीलंकेकडून सोनल दिनुशाने 103 धावांची झुंजार शतकी खेळी केली. मात्र भारतीय गोलंदाजांनी अखेर श्रीलंकेला 300 धावांचा टप्पा गाठू दिला नाही. सोनल दिनुशाने 162 चेंडूंचा सामना करताना 8 चौकार आणि 3 षटकारांसह 103 धावा केल्या. त्याच्यासोबत पसिंदू सूरियाबंदरानेही दमदार फलंदाजी करत 133 चेंडूत 80 धावा केल्या. या दोघांच्या खेळीमुळे श्रीलंकेने भारतीय गोलंदाजांना चांगलेच झुंजवले. भारताकडून प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. मानव सुथारनेही 3 विकेट्स घेतल्या. सारांश जैनने 2 विकेट्स घेत महत्त्वाची भूमिका बजावली. तर मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजाला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

सोनल दिनुशाचं पुन्हा शतक

फॉलोऑननंतर श्रीलंकेने 154 षटकांत 429 धावा करत 9 विकेट गमावल्या. त्यामुळे भारताला विजयासाठी मिळालेली संधी हुकली. पासिंदू सूरियाबंडाराने 173 चेंडूंत 92 धावांची शानदार खेळी केली. मात्र श्रीलंकेच्या डावाचा खरा हिरो ठरला सोनल दिनुषा. त्याने तब्बल 264 चेंडूंचा सामना करत नाबाद 133 धावा केल्या. त्याच्या खेळीत 8 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. संकटाच्या परिस्थितीत त्याने भारतीय गोलंदाजांचा संयमाने सामना करत श्रीलंकेचा डाव सावरला.

Ind vs Sl 2nd Test Sonal Dinusha : गंभीर फक्त बघतच राहिला, सोनल दिनुषाची एकाकी झुंज; दुसऱ्या डावातही धडाकेबाज शतक, आईच्या डोळ्यात पाणी

Author : किरण महानवर</

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ABP Majha