Sonal Dinusha Creates History Ind vs Sl 2nd Test : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत श्रीलंकेचा युवा फलंदाज सोनल दिनुशाने आपल्या दमदार फलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दोन सामन्यांच्या मालिकेतील चारही डावांत त्याने 50 किंवा त्याहून अधिक धावांची खेळी केली आहे.
या शानदार कामगिरीसह दिनुशाने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आपलं नाव कोरलं आहे.
विशेष म्हणजे, भारताविरुद्ध कसोटी कारकिर्दीतील पहिल्या चार डावांत 50+ धावा करण्याचा पराक्रम तब्बल 67 वर्षांनंतर पाहायला मिळाला आहे. 1959 मध्ये इंग्लंडच्या बॅरिंग्टन यांनी अशी कामगिरी केली होती. त्यानंतर भारताविरुद्ध कोणत्याही फलंदाजाला आपल्या पहिल्या चार कसोटी डावांत सलग 50+ धावा करता आल्या नव्हत्या. आता 2026 मध्ये सोनल दिनुशाने हा विक्रम मोडीत काढत इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे.
भारताविरुद्ध चारही डावांत 50+ धावा (Ind vs Sl 2nd Test Sonal Dinusha)
भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी सोनल दिनुशाने केवळ तीन कसोटी सामने खेळले होते. मात्र, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाविरुद्ध मैदानात उतरताच त्याने आपल्या फलंदाजीची वेगळीच झलक दाखवली. दिनुशाने भारताविरुद्धच्या पहिल्या चार डावांत अनुक्रमे 50+ धावा करत भारतीय गोलंदाजांना चांगलंच त्रस्त केलं. या चार खेळींपैकी दोन खेळीचं शतकात रूपांतर करण्यात त्याला यश आलं. सातत्यपूर्ण फलंदाजीच्या जोरावर तो भारताविरुद्ध पहिल्या चार डावांत 50+ धावा करणारा जगातील केवळ पाचवा फलंदाज ठरला आहे. विशेष म्हणजे, दिनुशा हा भारताविरुद्ध कसोटी कारकिर्दीतील पहिल्या चार डावांत 50+ धावा करणारा पहिला श्रीलंकन फलंदाज ठरला आहे.
दिनुशा-नुवांथा जोडीची भारताविरुद्ध कमाल
सोनल दिनुशाने केशरा नुवांथासोबत मिळून सातव्या विकेटसाठी 112 धावांची शानदार भागीदारी केली. भारताविरुद्ध फॉलोऑनमध्ये सातव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर झालेल्या श्रीलंकेच्या मोठ्या भागीदारींच्या यादीत ही भागीदारी तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत अव्वल स्थानावर रोमेश कालुवितरणा आणि चमिंडा वास यांची 1997 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध झालेली 137 धावांची भागीदारी आहे. तर 2016 मध्ये दिनेश चांदीमल आणि रंगना हेराथ यांनी इंग्लंडविरुद्ध 116 धावांची भागीदारी केली होती.
67 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती
भारताविरुद्धच्या या मालिकेने सोनल दिनुशाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठी ओळख मिळवून दिली आहे. कसोटी कारकिर्दीच्या सुरुवातीलाच भारतासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध सातत्याने मोठ्या धावा करत त्याने आपल्या क्षमतेची झलक दाखवली. 1959 मध्ये केन बॅरिंग्टन यांनी केलेला पराक्रम 67 वर्षांनंतर सोनल दिनुशाने पुन्हा करून दाखवला आहे.
Author : किरण महानवर

